Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा… हसन मुश्रीफ कोण आहेत?
कोल्हापूर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने (ED team) हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापा टाकला आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. आज सकाळी 25 जणांच्या ईडीच्या पथकाने (ED team) हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापा टाकला आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. यात त्यांच्यावर प्रामुख्याने अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप आहेत. दरम्यान, या छापेमारीनंतर मुश्रीफ नेमके कोण आहेत, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
आपण जाणून घेऊ हसन मुश्रीफ यांच्याबाबत :
कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचा चेहरा…
हे वाचलं का?
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ हे एक मोठं नाव आहे. जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून १९९९ पासून ते सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आघाडी सरकार सत्तेत असताना ते सातत्याने मंत्रीही राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. आक्रमक स्वभाव, बेधडक आणि बिनधास्त वृत्तीचे नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून मुश्रीफांना ओळखलं जात. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 1999 मध्ये स्थापनेनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. आता कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा कारभार त्यांच्याकडेच सोपवण्यात आला आहे. मुश्रीफांना सुरुवातीपासून शरद पवारांची साथ देणारा, त्यांच्यासोबत उभा राहणारा नेता म्हणून ओळखलं जातं. राष्ट्रवादीची ताकद कमी असताना किंवा अनेक जण पक्ष सोडून जात असतानाही ते शरद पवार यांच्यासोबत राहिले.
ADVERTISEMENT
कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री :
ADVERTISEMENT
कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. 1999 ला त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. पुढे 2001 मध्ये पशू संवर्धन आणि दूग्ध विकास राज्य मंत्री, 2004 ला पशू संवर्धन, दूग्ध विकास आणि वक्फ विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. 2008 मध्ये ते नगरविकास राज्यमंत्री होते.
जून 2014 ते ऑक्टोबर 2014 या कालावधीत त्यांच्याकडे जलसंपदा (कृष्णा खोरे) विभागाची धुरा होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास विभागाची धुरा सोपविण्यात आली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण अखेरच्या क्षणी दिलीप वळसे पाटील यांचं नाव अंतिम झालं.
सीमाप्रश्नावरील आक्रमक नेता :
हसन मुश्रीफ यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. दलित, मुस्लिम समाज तसंच शोषितांच्या प्रश्नांना त्यांनी कायमच आपल्या आंदोलनांमधून वाचा फोडली आहे. मुश्रीफ यांचं गाव आणि मतदारसंघ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाची जाण असलेला आणि त्यासाठी आक्रमक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कर्नाटक सीमा प्रश्न वादावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन आहेत. सहकार क्षेत्रातही त्यांची कारकीर्द मोठी आहे.
शस्त्रक्रिया करणारा आमदार :
हसन मुश्रीफ यांच्या राजकारणात त्यांच्या समाजकारणाचा मोठा वाटा आहे. कोल्हापूरमध्ये त्यांना शस्त्रक्रिया करणारा आमदार म्हणून ओळखलं जातं. रुग्णांना सरकारची किंवा वेळप्रसंगी पदरमोड करुन ते मदत करतात, असं त्यांच्या मतदारसंघातील लोकं सांगतात. त्यांना गरीबांच्या प्रश्नांची जाण आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मदत मागतो आणि ते ही मदत करतात.
कधी पत्र देतात, कधी पैसे देतात, कधी मुख्यमंत्री साहय्यता निधीमधून मदत मिळवून देतात, असंही त्यांच्या मतदारसंघातील लोकं सांगतात. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात. मुश्रीफ विधी व न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी सरकारी दवाखान्यात गरजू आणि गरीब रुग्णांना १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT