Maharashtra BJP President Meet MNS chief Raj Thackrey: भाजप-मनसेची युती होणार? चंद्रकात पाटील थेट ‘कृष्णकुंज’वर
मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. आज (6 ऑगस्ट) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. मागील काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि भाजपची जवळीक वाढत आहे. अशावेळी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसेची युती (Alliance) होणार असल्याची सध्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. आज (6 ऑगस्ट) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. मागील काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि भाजपची जवळीक वाढत आहे. अशावेळी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसेची युती (Alliance) होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्यात आगामी काही महिन्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी भाजप महाविकास आघाडीसमोर एकटी पडू शकते. अशावेळी शिवसेनेसारख्या पक्षाला टक्कर देण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेऊ शकते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची नाशिकमध्ये चंद्रकांत पाटलांशी भेट झाली होती. अशावेळी आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांची भेट होत असल्याने भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
पाहा या भेटीआधी चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
‘आम्ही राष्ट्रीय विचारांचे राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे परप्रांतियांबाबतची भूमिका तीच राहिली तर आमची त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. पण आमची त्यांच्यासोबत मैत्री राहिल.’