मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MNS Raj Thackeray Meets Eknath Shinde : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. आरोग्य विषयक चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा?

राज ठाकरे थोड्याचवेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वर्षा बंगल्यावर भेटले आहेत. राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने दोघांमध्ये अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरही चर्चा होऊ शकते अशी शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराला म्हणजेच मुरजी पटेल यांना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

वर्षा बंगल्यावरील या भेटीला एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय चर्चा होणार हे साहजिक आहेत. आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत त्यांच्यात चर्चा होते का, चर्चा झालीच तर त्याचा तपशील काय याची उत्सुकता लागली आहे.

हे वाचलं का?

दोन महिन्यातली ठाकरे आणि शिंदे यांची तिसरी भेट

गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT