मोदी सरकार मागे हटणार नाही.. अग्निपथ योजना रद्द करण्यास नकार; लष्कराने केलं जाहीर
Agnipath Protest: अग्निपथ योजनेवर विरोधकांचा सरकारचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेस आज (19 जून) या मुद्द्यावर सत्याग्रह आंदोलन करत आहे. सध्या या योजनेवरुन देशात रणकंदन माजलं आहे. असं असतानाही केंद्रातील मोदी सरकार मागे हटण्यास तयार नाही. आपण तयार केलेली योजनाच योग्य आहे आणि त्याच पद्धतीने भरती केली जाणार असल्याचं आता थेट लष्कराच्या वतीने सांगण्यात आलं आहे. […]
ADVERTISEMENT
Agnipath Protest: अग्निपथ योजनेवर विरोधकांचा सरकारचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेस आज (19 जून) या मुद्द्यावर सत्याग्रह आंदोलन करत आहे. सध्या या योजनेवरुन देशात रणकंदन माजलं आहे. असं असतानाही केंद्रातील मोदी सरकार मागे हटण्यास तयार नाही. आपण तयार केलेली योजनाच योग्य आहे आणि त्याच पद्धतीने भरती केली जाणार असल्याचं आता थेट लष्कराच्या वतीने सांगण्यात आलं आहे. यासाठी राजधानी दिल्लीत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराला तरुणांची गरज आहे. आज लष्कराचे सरासरी वय हे 32 वर्षे आहे, ते कमी करून 26 वर्षे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, तरुण हे अधिक जोखीम पत्करू शकतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अनिल पुरी हे DMA (Dept of Military Affairs) मध्ये अतिरिक्त सचिव आहेत. ते म्हणाले की, या योजनेची कल्पना 1989 पासूनच सुरू झाली होती. त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी अनेक देशांतील सैन्य भरती आणि त्यांच्या एक्झिट प्लॅनचा अभ्यास करण्यात आला आहे.
This reform was long pending. We want to bring youthfulness and experience with this reform. Today, a large number of jawan are in their 30s& officers are getting command much later than in the past: Additional Secy Lt Gen Anil Puri, Dept of Military Affairs on #Agnipath scheme pic.twitter.com/b97hBCg0K2
— ANI (@ANI) June 19, 2022
अनिल पुरी म्हणाले की, ‘अग्निवीरांना’ सियाचीन आणि इतर भागात समान भत्ता मिळेल जो सध्या कार्यरत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे. त्यांच्याशी सेवा-अटींबाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. जे कपडे लष्करी जवान परिधान करतात तेच कपडे अग्निवीरांना देखील दिले जातील. ज्या लंगरमध्ये सैनिक जेवतात, तेच जेवण अग्निवीरांना देण्यात येईल. जिथे सैन्याचे सैनिक राहतात तिथेच अग्निवीर देखील राहतील.’
हे वाचलं का?
पुढील 4-5 वर्षांत आम्ही 50-60 हजार सैनिकांना पुनर्संचयित करू आणि नंतर ते 90 हजार ते 1 लाखांपर्यंत वाढवू, असे लष्कराने सांगितले. योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही 46,000 जवानांसह सुरुवात केली आहे.
Adjutant General लेफ्टनंट जनरल बंशी पुनप्पा यांनी सांगितले की, ‘सैन्यात अग्निवीरांच्या भरतीची अधिसूचना 1 जुलै रोजी जारी केली जाईल. त्यानंतर लोक अर्ज नोंदणी सुरू करू शकतात. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून नोकर भरतीसाठीचा पहिला मेळावा सुरू होईल. यामध्ये शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी होईल, त्यानंतर प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर कॉलममधील गुणवत्तेनुसार त्यांना पुढे पाठवले जाईल.
ADVERTISEMENT
‘अग्निपथ’वरून आगडोंब! केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय
ADVERTISEMENT
नौदलाच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन-तीन दिवसांत म्हणजे 25 जूनपर्यंत जाहिरातींची माहिती प्रसारक मंत्रालयापर्यंत पोहोचेल. ‘आमच्या टाइमलाइननुसार, 21 नोव्हेंबरला आमची अग्निवीरची पहिली तुकडी INS चिल्का ओरिसा येथे रिपोर्टिंग सुरू करेल. महिलांनाही आम्ही अग्निवीर बनवत आहोत. मी 21 नोव्हेंबरची वाट पाहत आहे आणि मला आशा आहे की पुरुष आणि महिला अग्निवीर INS चिल्कावर रिपोर्ट करतील.’
दरम्यान, एकीकडे देशभरात तरुणाई संतापलेली असताना देखील केंद्रातील मोदी सरकार ही योजना मागे न घेण्याबाबत ठाम आहे. त्यामुळे अनेकांच्या मते आता आगामी काळात या योजनेवरुन अधिक राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT