महाराष्ट्रात सलग ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण, पाहा महत्त्वाचे अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात राज्यात ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ३ हजार ७४४ रूग्ण बरे झाले आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला महाराष्ट्रात ६४ हजार २६० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रुग्णसंख्येबाबतचे महत्त्वाचे अपडेट

हे वाचलं का?

दरम्यान, मुंबई महापालिकेत गेल्या २४ तासात 1145 रुग्ण सापडले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये मुंबईपेक्षाही अधिक रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात नागपूरमध्ये 1164 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1096 कोरोनाबाधित सापडले आहेत.

तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागलेल्या अमरावतीमध्ये काल देखील 700 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर अकोल्यात 163, यवतमाळमध्ये 162, बुलढाण्यात 135 आणि वाशिममध्ये 229 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

मुंबई – ७ हजार ५८३ अॅक्टिव्ह रूग्ण

ठाणे – ६ हजार ८९० अॅक्टिव्ह रूग्ण

पुणे – ११ हजार ५७० अॅक्टिव्ह रूग्ण

नाशिक – २ हजार १७२ अॅक्टिव्ह रूग्ण

औरंगाबाद – १ हजार ८५२ अॅक्टिव्ह रूग्ण

अमरावती – ६ हजार ४४६ अॅक्टिव्ह रूग्ण

अकोला – २ हजार ३९६ अॅक्टिव्ह रूग्ण

नागपूर ८ हजार ३१२ अॅक्टिव्ह रूग्ण

अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर नागपुरात सर्वाधिक रूग्ण आज घडीला आहेत. आज राज्यात ८ हजार ७०२ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या २१ लाख २९ हजार ८२१ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ५६ मृत्यूंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत, २२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत तर १४ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा जास्त कालावधीचे आहेत. हे १४ मृत्यू ठाणे-६, पुणे-३, औरंगाबाद-२ , नागपूर-१, सोलापूर-१ आणि वर्धा-१ असे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT