महागाई! ‘Amul’,’Gokul’ पाठोपाठ ‘Mother Dairy’ चं दूधही महागलं
एकीकडे जुलै महिन्यात 10 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. जून महिन्यात ही दरवाढ 16 वेळा झाली होती. इंधनाचे दर वाढले की आपोआप इतर पदार्थांचेही दर वाढतात. अमूल आणि गोकूळच्या दुधापाठोपाठ आता मदर डेअरीचं दूधही महाग झालं आहे. मागच्या आठवड्यात अमूलने दूध दरात वाढ करण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर गोकुळने शुक्रवारी दुधाच्या खरेदी विक्री किंमतीमध्ये […]
ADVERTISEMENT
एकीकडे जुलै महिन्यात 10 वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. जून महिन्यात ही दरवाढ 16 वेळा झाली होती. इंधनाचे दर वाढले की आपोआप इतर पदार्थांचेही दर वाढतात. अमूल आणि गोकूळच्या दुधापाठोपाठ आता मदर डेअरीचं दूधही महाग झालं आहे. मागच्या आठवड्यात अमूलने दूध दरात वाढ करण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर गोकुळने शुक्रवारी दुधाच्या खरेदी विक्री किंमतीमध्ये वाढ केली. आता मदर डेअरीनेही दुधाचे दर वाढलवे आहेत. महत्त्वाची बाब ही की हे दर दिल्ली NCR मध्ये वाढले आहेत. दिल्ली-एनसीआर वगळता इतर ठिकाणच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
अमूल आणि गोकूळनंतर मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीचे वाढीव दर 11 जुलैपासून म्हणजेच रविवारपासून लागू करण्यात आले येतील. आता मदर डेअरीचं दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. मदर मदर डेअरीने यापूर्वी २०१९ मध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दुधावर ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती मदर डेअरीने दिली आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध 55 रुपयांऐवजी 57 रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही 45 रुपयांवरून 47 रुपये झाले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी दिवसाला 30 लाख लिटरपेक्षा अधिक दुधाची विक्री करते. इंधनाचे वाढते दर आणि मनुष्यबळाचा वाढलेल्या खर्चामुळेही ही दरवाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचलं का?
Mother Dairy raises its liquid milk prices by Rs 2/litre in Delhi NCR with effect from July 11, 2021. The new prices will be applicable for all milk variants. The milk prices were last revised about 1.5 years ago in December 2019. pic.twitter.com/YzzbMVhYwv
— ANI (@ANI) July 10, 2021
राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूधसंघ असलेल्या ‘गोकुळ’ने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किंमतीमध्ये वाढ केली. यामध्ये म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याच वेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे महानगरातील दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. ‘गोकुळ’तर्फे मुंबईमध्ये प्रतिदिन आठ लाख लिटर, तर पुण्यामध्ये तीन लाख लिटर दुधाची विक्री केली जाते.
1 जुलैपासून वाढले अमूलचे दर
ADVERTISEMENT
1 जुलैपासून अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम अशा सगळ्यांची किंमत 2 रूपयांनी वाढली आहे. अमूलनेही दीड वर्षाने दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT