विधान परिषदेचा रणसंग्राम! काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधान परिषदेचा रणसंग्राम!
काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर
कोणाला मिळाली संधी?
MLC Congress Candidates : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने या उमेदवारांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले असून पक्षाकडून तीन प्रमुख मतदारसंघांत आपले शिलेदार रिंगणात उतरवण्यात आले आहेत.
काँग्रेसचे उमेदवार कोण?
या जाहीर झालेल्या उमेदवारी यादीनुसार नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने अभिजित गोविंदराव वंजारी यांना पुन्हा एकदा संधी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर दुसरीकडे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून श्री. जयंत दिनकर आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली असून अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती ऋषिकेश पोहरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
हे ही वाचा : पाऊस विसरा, आता उष्णतेची लाट, कुठल्या भागांना अलर्ट?
निवडणुक कधी होणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 6 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. त्यानंतर सादर केलेल्या अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे.
हे ही वाचा : 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
निकाल कधी?
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केले जातील. काँग्रेसने आपले तीनही उमेदवार जाहीर केल्यामुळे आता या मतदारसंघांमधील राजकीय वातावरण अधिक तापण्यास सुरुवात झाली आहे.
