तुझा ओम बाळ, कलेक्टर अन् तुला वेळ आल्यास संपवून टाकू : उमेदवाराच्या घरावर धमकीचं पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद, गणेश जाधव :

ग्रामपंचायत निवडणुकांवरून उस्मानाबाद जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि मसला खुर्द गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार कांताबाई साळवे आणि त्यांचा मुलगा, राष्ट्रवादी किसान सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांना एकत्रितपणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. साळवे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं हे धमकीचं पत्र चिटकवलं आहे.

काय आहे पत्रात?

ज्ञानेश्वर साळवे मदत कर, मतदानातून माघार घे, शेवट पाठिंबा दे, नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर आणि तुला बघून घेऊ, वेळी आली तर संपवूनही टाकू. इथून तुझ्या आईला मतदान कोण करतयं ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरला पण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय बघू आता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या पत्राबाबत बोलताना ज्ञानेश्वर साळवे म्हणाले, माझ्या घरावर धमकीची चिठ्ठी लावून राजकीय द्वेषातून उघडपणे धमकी दिली जात आहे. अशी जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर सरकारने काय सुरक्षा दिली आहे? सरकारने महाराष्ट्राचं बिहार करून टाकलं आहे. आहेत कुठे राज्याचे गृहमंत्री? कुठे आहेत पोलीस? पोलिसांना तक्रारीसाठी फोन केला. पण पोलिसांनी फक्त १० किलोमीटर अंतरावर येण्यासाठी २ तास घेतले. यावर आता २४ तासांत कारवाई नाही झाली, असा आरोपही त्यांनी केला.

ADVERTISEMENT

पाटील-निंबाळकर वादाची किनार

काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी दोघांनीही एकमेकांसाठी आरेतुरेची भाषा वापरली होती. त्यावेळी राणा जगजितसिंह पाटलांनी ओमराजेंना ‘बाळ’ असं संबोधलं होतं. त्यानंतर आता या धमकीच्या पत्रातही ओमराजेंचा ‘बाळ’ असा उल्लेख आला आहे. त्यामुळे या धमकीच्या पत्राला आता पाटील-निंबाळकर वादाची किनार लागली आहे.

ADVERTISEMENT

गावातील निवडणूक पार्श्वभूमी :

मसला खुर्द या गावात सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. सरपंचपदी रामेश्वर वैद्य बिनविरोध निवडून आले आहेत. ते भाजपचे आणि त्यातही राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे मानले जातात. तसंच गावच्या ग्रामपंचायतसाठी 11 जागांपैकी 7 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर 4 जागांसाठी 18 तारखेला मतदान होत आहे. 4 जागांसाठी 2 स्थानिक पॅनलमध्ये लढत होत आहे. 2800 मतदार आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT