Video : युट्यूबरचा नादच खुळा, महिला वेटरला का दिली लाखो रुपयांची ‘ही’ टीप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Youtuber mr beast gives a car women waitress
Youtuber mr beast gives a car women waitress
social share
google news

Mrbeast gives new car to Waitress : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका (jimmy donaldson) युट्यूबरने एका महिला वेटरला टीप स्वरूपात आलिशान कार दिली आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. तसेच हा युट्यूबर आहे कोण? खरंच त्याने महिलेला कार दिलीय का? असा सवाल उपस्थित होतोय.(mrbeast jimmy donaldson youtuber gives a new car as tip to waitress instagram video viral)

ADVERTISEMENT

व्हायरल व्हिडिओत काय ?

प्रसिद्ध युट्यूबर (Mrbeast) एका हॉटेलमध्ये बसला आहे.हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर त्याने महिला वेटरला टीपसाठी बोलावले. तुला आतापर्यंत सर्वांत महागडी टीप किती मिळाली आहे? असा सवाल त्याने केला आहे.या सवालावर तिने 50 डॉलर (4100) रूपये टीप मिळत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर युट्यूबरने मी तूला टीपमध्ये कार देत असल्याची माहिती दिली. हे एकूण महिला वेटरला धक्काच बसला. तसेच तिला ही थट्टा मस्करी वाटली. पण नंतर त्याने तिच्या हातात नव्या कोऱ्या गाड्याची चावी हातात दिली.

हे ही वाचा : मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?

इतके होऊनसुद्दा तिला विश्वास बसला नाही, आणि त्याने तिला हॉटेलबाहेर नेले. हॉटेलबाहेर नेते तिला तिची गाडी दाखवली.दोघे गाडीत देखील बसले होते. इतकी मोठी टीप मिळाल्याचे पाहून महिला वेटर भारावली आहे. मीस्टर बीस्ट (Mrbeast) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओची चर्चा आहे.

हे वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by MrBeast (@mrbeast)

कोण आहे हा युट्यूबर?

मीस्टर बीस्ट (Mrbeast) हा एक 24 वर्षांचा जगप्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे युट्यूब चॅनलवर 139 मिलियन सब्सक्राईबर आहेत. या युट्यूबरचे खरं नाव जिम्मी डॉन्ल्डसन आहे.या युट्यूबरचा जगभऱात सर्वाधिक फॉलोवर आहेत. या युट्यूबरचा टीपचा हा व्हिडिओ सध्या ट्रेंडमध्ये आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा धोका, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आदेश

दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर आतापर्यंत 11 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत, तर 1 करोडपेक्षा जास्त व्हुज आले आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. अनेकांनी या व्हिडिओवर वेटरची नशीब चमकल्याची कमेंट केली आहे. तर अनेकांनी त्याला आपल्या शहरात येण्याचे आमंत्रण दिले आहे. मीस्टर बीस्टचा (Mrbeast) हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT