मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर भीषण अपघात, ५ जण ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सोमवारी मध्यरात्री टेम्पो, ट्रेलर, कार आणि एका मल्टीव्हेइकलच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल, वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यावरुन मुंबईकडे जात असताना बोरघाटाजवळ फुडमॉलजवळ हा अपघात झाला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्याने टेम्पोला धडक दिली. ज्यामुळे टेम्पो पलटी होऊन मागून येणाऱ्या दोन कारवर जाऊन आदळला. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नसल्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढली. चारचाकी गाड्यांचा या अपघातात चक्काचूर झाला आहे.

अपघातात मृत पावलेल्यांना पुढील कारवाईसाठी खोपोली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कारमधील कुटुंब हे एका घरगुती कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांमध्ये मंजू नाहर, डॉ. वैभव झुंझारे, उषा झुंझारे, वैशाली वैभव झुंझारे आणि पाच वर्षांची एक मुलगी श्रिया हिचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT