Mumbai Crime : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २७ वर्षीय युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीची आई, आरोपी पतीचे नातेवाईक आणि लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्यावरही गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. १५ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे […]
ADVERTISEMENT
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २७ वर्षीय युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीची आई, आरोपी पतीचे नातेवाईक आणि लग्न लावून देणाऱ्या पुजाऱ्यावरही गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT
१५ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे लग्न जानेवारी महिन्यात पार पडलं होतं. डिलेव्हरीआधी डॉक्टरांनी पतीला मुलीचं वय विचारलं असता पतीने आपल्या पत्नीचं वय २० असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर डॉक्टरांनी मुलीचं आधारकार्ड तपासलं असता त्यावर तिचं जन्म वर्ष हे २००६ असं आढळून आलं.
अत्याचाराचा कळस! चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवून नराधमाने आईवर केला बलात्कार
हे वाचलं का?
डॉक्टरांनी यानंतर तात्काळ आग्रीपाडा पोलीस ठाण्याला याबद्दलची माहिती दिली. पीडित मुलीच्या आईला आपल्या मुलीचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या कठीण जात होतं. याचसाठी तिने आपल्या मुलीचं शिक्षणही थांबवलं. सदर पीडित मुलगी ही पाचवीपर्यंत शिकलेली असून मुलीची जबाबदारी कमी होईल या हेतूने आईने तिचं लग्न लावून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुलगी ही अल्पवयीन असल्याचं माहिती असूनही आरोपीच्या पालकांनी या लग्नात सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबूकवरील मित्राच्या प्रेमात पडली विवाहीत महिला, लग्नाचं आमिष दाखवून आरोपीने केला बलात्कार
ADVERTISEMENT
जानेवारी महिन्यात पीडित मुलीचं आरोपीशी लग्न झाल्यानंतर ती शिवडी येथील त्याच्या घरात रहायला गेली. यानंतर वारंवार आरोपी या मुलीवर शारिरिक अत्याचार करत होता. पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर हजर केलं असून त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT