Mumbai Police दलातील ऐतिहासिक नियुक्ती, देवेन भारतींवर मोठी जबाबदारी

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPS Deven Bharti appointed as special CP Mumbai: मुंबई: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आजवरच्या इतिहासातील एक मोठा बदल घडवून आणला आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) हे सर्वात महत्त्वाचं पद समजलं जात होतं. मात्र, आतापासून मुंबईत विशेष पोलीस आयुक्त (Special Police Commissioner Mumbai) हे पद अधिकाराचं असणार आहे. ज्या पदावर फडणवीसांच्या मर्जीतले समजले जाणारे आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती करण्यात आली. ज्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. या नव्या पदनिर्मितीमुळे आता मुंबई पोलिसातील आयुक्त पद हे दुसऱ्या क्रमांकावर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. (mumbai police gets post of special commissioner of police. ips deven bharti appointed as special cp mumbai)

ADVERTISEMENT

मुंबई पोलीस दलात विशेष पद तयार करुन त्यावर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी देवेंद्र फडणवीस हे मागील काही दिवसांपासूनच अनुकूल असल्याचं बोललं जात होतं. अखेर याच गोष्टीवर आज (4 जानेवारी) शिक्कामोर्तब देखील झालं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर मुलीचं लग्न सोडून ऑनड्यूटीवर; लोक म्हणाले,…

हे वाचलं का?

देवेन भारती हे 1994 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मुंबईतील सर्वात शक्तिशाली प्रशासकीय अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. नंतर अतिरिक्त डीजीपी म्हणून त्यांना बढती देऊन त्यांची दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती.

मात्र 2019 साली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते याच पदावर कायम होते. मात्र, 13 डिसेंबर 2022 रोजी देवेन भारती यांच्या जागी बदली सहआयुक्त (वाहतूक) पदावर असलेल्या राजवर्धन यांनी केली आहे. मात्र, आता देवेन भारती यांची थेट विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करुन शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना पुन्हा एकदा पोलीस दलातील मुख्य प्रवाहात आणलं आहे.

ADVERTISEMENT

फडणवीसांच्या मर्जीतले देवेन भारती

2014 साली देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यानंतर त्यांनी तेव्हाही गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवलं होतं. यावेळी देवेन भारती हे त्यांच्या अत्यंत मर्जीतले अधिकारी समजले जायचे. यासोबतच रश्मी शुक्ला या देखील फडणवीसांच्या मर्जीतली अधिकारी होत्या. त्यामुळेच आता पुन्हा एकदा फडणवीस सत्तेत आल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. पण फोन-टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला यांना महत्त्वाचं पदावर आणणं अडचणीचं ठरु शकतं.

ADVERTISEMENT

त्यामुळेच आता देवेन भारती यांच्यासाठी खास पद तयार करुन त्यांच्याकडे मुंबई पोलिसांची सगळी सूत्रं सोपविण्यात आली आहेत.

याबाबत जो आदेश जारी करण्यात आला आहे त्यानुसार, मुंबईतील सर्व सह आयुक्त हे आता थेट विशेष पोलीस आयुक्तांना म्हणजेच देवेन भारतींना रिपोर्ट करतील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT