मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण कधीच झालं नव्हतं – आशिष शेलार
API सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकण्यात आलं आहे. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे सध्या NIA च्या अटकेत आहेत. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सर्वच स्तरातून राज्य […]
ADVERTISEMENT
API सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकण्यात आलं आहे. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी सचिन वाझे सध्या NIA च्या अटकेत आहेत. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सर्वच स्तरातून राज्य सरकारवर टीका होत असताना मुंबई पोलीसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
ADVERTISEMENT
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणामध्ये राज्य सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. एका सामान्य माणसाच्या खुनाप्रकरणी, एका API ला अटक होते. त्याच्या गाडीत नोटांची बंडलं, नोटा मोजायचं मशीन, नंबर प्लेट सापडतात. यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. दुर्दैवाने मुंबई पोलिसांचं एवढं खच्चीकरण आणि बदनामी याआधी कधीच झाली नव्हती. हे ठाकरे सरकारचं पाप आहे असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच…त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या..
दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलीसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती.
ठाकरे सरकारचे हे पाप आहे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2021
परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस दलाचा पदभार सोपवण्यात आला आहे. सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला लागलेला डाग आणि बिघडत चाललेली परिस्थिती नगराळे कशी सांभाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेमंत नगराळे यांच्या कारकिर्दीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात…
हे वाचलं का?
१) हेमंत नगराळे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी
२) सहावीपर्यंत चंद्रपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण, यानंतरचं शिक्षण नागपूरच्या पटवर्धन हायस्कुलमध्ये
ADVERTISEMENT
३) VRCE नागपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी
ADVERTISEMENT
४) याव्यतिरीक्त नगराळे यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. याव्यतिरीक्त नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पुरस्कार, आंतरिक सुरक्षा पदक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं
१९८९ ते ९२ या काळात चंद्रपूरच्या नक्षल भागात नगराळे यांचं पहिलं पोस्टींग होतं. यानंतर १९९२ ते ९२ या काळात नगराळे सोलापूरमध्ये DCP या पदावर कार्यरत होते. बाबरी मशिदीच्या पतनानंतर सोलापूर शहरात दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात नगराळे यांचा मोठा वाटा मानला जातो. १९९४ ते १९९६ या काळात नगराळे रत्नागिरीमध्ये पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळातही नगराळे यांनी एन्रॉन प्रकल्पाशी संबंधित जमिन अधिग्रहाणाचे अनेक मुद्दे हाताळले होते. १९९६ ते ९८ या काळात हेमंत नगराळे यांनी CID विभागात अधिक्षक पदावर काम केलं. या काळात MPSC पेपर लिक, अंजनीबाई गावीत ने केलेलं लहान मुलांची हत्या ही प्रकरणं नगराळे यांनी हाताळली होती.
यानंतर काळी काळासाठी हेमंत नगराळे यांनी CBI या देशातील सर्वोच्च यंत्रणेतही काम केलं आहे. इथेही नगराळे यांनी आपली चमक दाखवत केतन पारेखचा घोटाळा, माधोपुरा कोऑपरेटीव्ह बँक, हर्षद मेहता केसची चौकशी केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT