भोंग्यांचा वाद : राज ठाकरेंचा इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क; डेल्टा टीम केली जाणार तैनात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात बोलत असताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले जावेत असा अल्टिमेटम राज यांनी आपल्या भाषणात दिला होता. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अझान विरुद्ध हनुमान चालीसा असा राजकीय वादही रंगलेला पहायला मिळाला. राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटकडे पाहता, […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात बोलत असताना मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा काढल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले जावेत असा अल्टिमेटम राज यांनी आपल्या भाषणात दिला होता. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अझान विरुद्ध हनुमान चालीसा असा राजकीय वादही रंगलेला पहायला मिळाला.
राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटकडे पाहता, ३ मे ला शहरात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट तयारी केल्याचं कळतंय.
रात्री 10 ते सकाळी 6 शहरात भोंग्यांना बंदी ! मुंबई पोलिसांचा महत्वाचा निर्णय
तीन तारखेपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्याला उत्तर देईल असा अल्टिमेटम राज यांनी दिला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ३ तारखेसाठी अशा पद्धतीने तयारी करुन ठेवली आहे की एखाद्या ठिकाणाहून जर तक्रार आली तर ५ मिनीटांत मुंबई पोलीस तिकडे पोहचणार आहेत.