वाझे आणि परमबीर सिंग यांच्यात तब्बल तासभर चर्चा, ‘या’ भेटीची मुंबई पोलीस करणार चौकशी

दिव्येश सिंह

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांच्यात आज (29 नोव्हेंबर) तब्बल तासभर एका खोलीत चर्चा झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे दोघेही चांदीवाल आयोगासमोर हजर झाले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांच्यात आज (29 नोव्हेंबर) तब्बल तासभर एका खोलीत चर्चा झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे दोघेही चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. याच दरम्यान, दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. दरम्यान, आता मुंबई पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, ही भेट नेमकी कोणाच्या परवानगी झाली.

दरम्यान, सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे एक खोलीत बसून तब्बल तासभर चर्चा करत असल्याची बातमी समोर आली तेव्हा मुंबई पोलिसात देखील एकच खळबळ माजली. ज्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम तात्काळ चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहचली आणि त्यांनी या भेटीबाबत तपास सुरु केला.

मुंबई पोलिसांना हेच जाणून घ्यायचं आहे की, या दोन्ही आरोपींना एकमेकांना भेटण्यासाठी नेमकी कोणी परवानगी दिली होती. जर त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती तर मात्र, मुंबई पोलीस आता त्यांच्या भेटीची स्वतंत्रपणे चौकशी करु शकतं. याच दरम्यान, सचिन वाझेला जेलमधून आयोगासमोर हजर करणाऱ्या पथकाची देखील चौकशी केली जाऊ शकते.