Mumbai Rain : पावसाची जोरदार बॅटींग, मुंबई पुन्हा कोलमडली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईचे अनेक सखल भाग जलमय झालेले पहायला मिळत आहेत.

हे वाचलं का?

रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे लालबाग-चिंचपोकळी परिसरात पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती

ADVERTISEMENT

काल रात्रीपासून पडत असलेल्या या पावसाचा जोर अद्याप कायम असल्यामुळे मुंबईतल्या रस्त्यांना अशा पद्धतीने नदीचं रुप आलं होतं.

ADVERTISEMENT

अनेक दुचारी-चारचाकी वाहनं या पावसाच्या पाण्यात बंद पडली. काही भागांमध्ये रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या दुचाकी गाड्या वाहून गेल्याचं कळतंय. लालबागमध्ये पावसात बंद पडलेली आपली गाडी घेऊन जाताना एक युवक

रस्त्यावर पोलिसांनी लावलेलं बॅरिकेडींगही या पावसामुळे पडून गेलं. अनेक चारचाकी वाहनं या पाण्यात अडकून बंद पडली. आज पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंद पडलेल्या टॅक्सीला धक्का मारुन घेऊन जाताना टॅक्सीचालक

दादर, परळ, चिंचपोकळी, लालबाग अशा अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलं. ज्यामधून जाताना असे छोटेसे अपघातही पहायला मिळाले.

मुंबई उपनगरातील भांडूप LBS मार्गावरील घरांमध्ये पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं. आपल्या जिवनावश्यक वस्तू वाचवण्याचा मुंबईकरांनी केलेला केविलवाणा प्रयत्न

मालाड भागात रहिवासी आपल्या घरात साचलेलं पाणी बाहेर काढताना…

जिथे पहावं तिकडे पाणीच-पाणी अशी परिस्थिती मुंबईच्या रस्त्यांवर पहायला मिळत होती.

पावसाचा हा जोर सकाळीही कायम राहिलेला पहायला मिळाला…हिंदमाता परिसरात सकाळी रस्त्यात साचलेल्या पाण्यात अडकून अनेक गाड्या बंद पडत होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT