खळबळजनक! Mansukh Hiren सारखीच आणखी एका व्यापाऱ्याची हत्या, मृतदेहही सापडला मुंब्रा खाडीतच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विक्रांत चव्हाण, ठाणे

अँटेलिया कार स्फोटकं प्रकरणातील साक्षीदार आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा आणखी एका व्यापाऱ्याची हत्या झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर या व्यापाऱ्याचा मृतदेह देखील मुंब्य्राच्या खाडीतच सापडला असल्याने एकच खळबळ माजली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मनसुख हिरेन याचा मृतदेह ज्या ठिकाणी आणि ज्या अवस्थेत सापडला होता त्याच ठिकाणी आणि तशाच अवस्थेत भरत जैन यांचा देखील मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरत जैन यांचा मृतदेह हात, पाय बांधलेल्या आणि तोंडात कपडा कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे आता असा संशय व्यक्त केला जाता आहे की, मनसुख प्रमाणेच भरत जैन याची हत्या करुन त्याचा मृतदेह देखील खाडीत फेकण्यात आला असावा.

ठाण्यातील चरई या परिसरात राहणारे व्यापारी ज्वेलर्स भरत जैन यांचा मृतदेह (20 ऑगस्ट) रोजी ठाण्यातील मुंब्रा रेतिबंदर येथील खाडीत सापडला.

ADVERTISEMENT

भरत यांची पत्नी आणि त्यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी भरत हे घरी आलेच नाही. पत्नीने त्यांना जेव्हा रात्री फोन केला होता तेव्हा आपण थोड्याच वेळात घरी येऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण रात्र उलटून गेली तरी ते घरी परतले नाही.

ADVERTISEMENT

त्यानंतर याप्रकरणी त्यांनी पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली. त्यामुळे पोलिसांनी भरत जैन यांच्या दुकानात जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं. जिथे त्यांना भरत जैन यांचं दुकान फोडून तिथं चोरी झाल्याचं आढळून आलं.

जेव्हा पोलिसांनी येथील सीसीटीव्ही तपासलं तेव्हा एका ओला ड्रायव्हरला घेऊन त्याच्याकडे यासंबंधी चौकशी केली. मात्र, त्याच्याकडून अधिक काहीही माहिती न मिळाल्याने त्याला पोलिसांनी सोडून दिलं.

मात्र, असं असताना आता तब्बल सात दिवसानंतर भरत जैन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरुन भरत जैन यांच्या कुटुंबीयांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की, फक्त अपहरण, चोरी यामुळे भरत जैन यांची हत्या झालेली नसावी.

कारण बेपत्ता झाल्यापासून तब्बल सात दिवसानंतर भरत जैन यांचा मृतदेह सापडला आहे. अशावेळी आरोपीने काही तरी प्लॅनिंग करुनच त्यांची हत्या केली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता त्याची ठिकाणी भरत जैन याचा देखील मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणामागील गूढ अधिकच वाढलं आहे.

दरम्यान, भरत जैन यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय आणि ठाण्यातील व्यापारी पोलिसांवर खूपच संतप्त झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळेच आरोपी अद्यापही सापडत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर महाराष्ट्रात सामान्य माणसाचा जीव हा अक्षरश: कवडी मोलाचा झाला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

ATS ने उलगडले मनसुख हिरेनच्या खुनाचे रहस्य, जाणून घ्या घटनाक्रम

भरत जैन यांचा मृतदेह नेमका कसा सापडला?

मुंब्रा रेतीबंदर खाडीत 30 ते 35 वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह गणेश विसर्जन घाटावर आढळला होता. सदर मृतदेह हा पाण्यावर तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाला दिली होती.

आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या जवळ काही कागदपत्रं सापडल्याने ती व्यक्ती ज्वेलर्स भरत जैन हाच असल्याची माहिती उपलब्ध झाली.

ठाण्यात राहणारा भरत जैन हा मुंब्रा रेतीबंदर परिसरात कशाला गेला होता? तसेच भरत जैन याची नेमकी हत्या का करण्यात आली असावी? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT