नागपूर: दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या चिमुकल्याची हत्या? मृतदेह सापडला नदीच्या कॅनलमध्ये

मुंबई तक

योगेश पांडे, नागपूर: नागपूरच्या कोराडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर असं मृतक चिमुकल्याचे नाव आहे. बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृतदेह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

योगेश पांडे, नागपूर: नागपूरच्या कोराडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर असं मृतक चिमुकल्याचे नाव आहे. बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे. याबाबतची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपासणी सुरु केली आहे.

दोन दिवसापूर्वी बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर हा चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. बॉबी कुठेही दिसत नसल्याचे त्याच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कोराडी परिसर पिंजून काढला आहे, मात्र बॉबीचा कुठेही शोध लागला नाही.

त्यामुळे बॉबी हरवल्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून बॉबीचा शोध घेतला. मात्र, पोलिसांना सुद्धा बॉबीचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर काल (3 जानेवारी) बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळून आला आहे.

हे वाचलं का?