Nagpur MLC election : फडणवीसांच्या ‘त्या’ व्हीडिओमुळे गाणार यांचा पराभव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur MLC election 2023 :

ADVERTISEMENT

नागपूर : अमरावती : कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता विधान परिषद निवडणुकीत अन्य ३ जागांवर भाजपच्या पदरी निराशा पडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा मोठा पराभव झाला. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील पराभवाच्या छायेत आहेत. (The BJP had earlier lost its long-held stronghold of the graduate constituency and now the BJP has lost its dominance in the teacher constituency.)

या तिन्ही ठिकाणच्या भाजपच्या पराभवाची अनेक कारण आहेत. यात संघटनात्मक बांधणी, उमेदवाराविषयीची नाराजी अशी वेगवेगळी कारण सांगता येतील. पण नागो गाणार यांच्या पराभवाला आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील तो व्हिडिओ जबाबदार असल्याची चर्चा नागपूरला सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

OPS : विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजर असलेली ‘जुनी पेन्शन योजना’ काय आहे?

काय म्हणाले होते फडणवीस :

नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर जास्तीच स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. राज्याची आर्थिक स्थिती पाहता जुनी पेन्शन देणे कठीण आहे यामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात जाईल, असं फडणवीस सभागृहात म्हणाले होते.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हीडिओ शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल सुद्धा झालेला होता. त्यांचं वक्तव्य हे रेकॉर्डवरील वक्तव्य असल्याने शिक्षकांमध्ये मोठा नाराजीचा सुरज उमटला आणि आता आपल्याला जुनी पेन्शन मिळणार नाही अशी शिक्षकांची खात्री पटली. त्यामुळे त्यांचा रोष अधिकच वाढत गेला, शेवटी शिक्षकांनी मतदानाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करत नागो गाणार यांचा दारुण पराभव केला, असं सांगितलं जातं आहे.

ADVERTISEMENT

व्हायरल झालेला हाच तो व्हीडिओ

भाजपने यापूर्वी पदवीधर मतदारसंघाचा त्यांचा अनेक वर्षांचा असलेला गड गमावला आणि आता शिक्षक मतदार संघावरील आपले वर्चस्व भाजपने गमावले.

गाणार यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका?

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या विजयाच्या हॅट्रिकचे स्वप्न भंगले असून भाजपमध्ये ऑल इज वेल नसल्याचे दिसून येत आहे. गाणार यांना समर्थन देण्याला भाजपच्या अंतर्गत नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरुवाती पासून खदखद होती, पण उघडपणे ती बोलून दाखवली गेली नव्हती.

MLC Election : तांबेंच्या विजयोत्सवात थोरातांची गाडी; ‘576’ दिला खास मेसेज

त्यामुळे गाणारांसाठी पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी मनापासून प्रचार केलेला नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजपमधून नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणुकीमध्ये लढण्यासाठी काही नेते इच्छुक होते. गेल्या दीड ते दोन वर्षापासून काही नेत्यांनी तर आपले नेटवर्किंग सुद्धा सुरू केले होते. मात्र आधी उमेदवारी जाहीर करुन नंतर थेट पाठिंबा मागणं ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची कृती भाजप नेत्यांना खटकल्याची चर्चा आहे.

येत्या काही दिवसात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. परंतु पदवीधर आणि आता शिक्षक या दोन्ही विधान परिषदेवर भाजपचा झालेला पराभव येत्या महानगरपालिकेत जर कायम राहिला तर 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपला जड जाणार यात काही शंका नाही..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT