नागपूर हादरलं! पत्नी, मुलीची हत्या करून स्वतः घेतला गळफास
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी सहा अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच आज नागपुर पुन्हा एकदा हादरलं. नागपूरमधील हिंगणा औद्योगिक वसाहतीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला. […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
सहा अर्भक सापडल्याची घटना ताजी असतानाच आज नागपुर पुन्हा एकदा हादरलं. नागपूरमधील हिंगणा औद्योगिक वसाहतीतील राजीव नगर येथे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील राजीव नगर येथे पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला. दोघींची हत्या केल्यानंतर घरात गळफास घेतला.
हे वाचलं का?
रात्री ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह नागपूर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
नागपूर : ‘त्या’ सहा अर्भकांचं गुढ उकललं, सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला उलगडा
ADVERTISEMENT
नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजीव नगर सरोदी मोहल्ल्यात विलास चंपतराव गवते हे त्यांच्या पत्नी रंजना आणि मुलगी अमृता सोबत राहत होते.
ADVERTISEMENT
रात्री उशिरा विलास गवते यांनी पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर स्वतः गळफस घेऊन आत्महत्या केली. विलास गवते यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT