काँग्रेसमधल्या संस्थानिकांना नाना पटोलेंचा दम, ‘पक्ष तुमच्या घरचा…’

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nana Patole warn congress leaders : विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra legislative council election 2023) निमित्ताने काँग्रेसमध्ये (Congress) चांगलीच सुंदोपसुंदी रंगलीये. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंनी (Sudhir tambe and satyajeet tambe) थेट पक्ष शिस्तीलाच आव्हान दिलं. त्यामुळे काँग्रेसमधील गटातटाचं (Politics in congress) राजकारणही चर्चेत आलं. काँग्रेसमधील प्रदेशानिहाय असलेल्या नेत्यांमधील वादही केंद्रस्थानी आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra congress president) नाना पटोले (nana patole) यांनी मुंबई Tak ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत नाना पटोले यांनी संस्थानिक शब्दाच्या आडून बड्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला.

नाना पटोले सत्यजित तांबे, सुधीर तांबे आणि काँग्रेसमधील सद्यस्थितीवर काय बोलले? वाचा मुलाखत

प्रश्न: सत्यजीत तांबेना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. तुमची याबाबतची नेमकी बाजू काय?

नाना पटोले: महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्र हा काँग्रेस विचारांचा आहे. एक काळ होता की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नावावर कोणीही उभं केलं तरी निवडून यायचा. अशी ती परिस्थिती होती. अनेक संस्थानिक कुटुंबीय काँग्रेससोबत जोडले गेले. त्यानांही सत्तेत सहभागी होता आलं. मोठ्या-मोठ्या पदावर ते राहिले. काही ठिकाणी अॅडजस्टमेंटचं राजकारण झालं. त्यामुळे काँग्रेसला नुकसान झालं असेल. या सगळा अंदाज आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नावर साध्या आणि सरळ भाषेत सांगतो की, ते सगळ्यांनां कळतं की, जो मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

म्हणजे सुशिक्षित लोकांचा मतदार आहे. डॉ. सुधीर तांबे, त्यांच्या पती तसेच सत्यजीत तांबे त्यांच्या पत्नी आणि थोरात साहेबांची मुलगी हे पाच लोकंच फॉर्म भरायला जातात. फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतात. सुधीर तांबेंना तिकीट देऊन सुद्धा ते फॉर्म भरत नाही. बाहेर आल्यावर सत्यजीत तांबे म्हणतात की, मी फडणवीस आणि बावनकुळेंकडे जाऊन त्यांची मदत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करणं.

खरं बाहेर सल्ला देत असेल तर त्यांनाही माझा सल्ला आहे की, दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा तिकिटाचा संघर्ष असता तर ते पक्षाने दोघांना बसवून आणि समजवून सामोपचाराने पुढे जाता आलं असतं. हा एक घरातील प्रश्न होता.

ADVERTISEMENT

त्यांनी मला सांगितलं असतं की, मला आता नाही लढायचं माझ्या मुलाचा आग्रह आहे. तर मी सांगितलं असतं मुलाच्या नावानं फॉर्म भरा मी वरुन तुम्हाला परवानगी द्यायची जबाबदारी माझी पण फॉर्म भरून टाका.

ADVERTISEMENT

तुमच्या माध्यमातून जे खरं आहे ते जाऊ द्या लोकांसमोर.

मी साडेबारा वाजता सुधीर तांबेंशी बोललो की, कारण की, मला थोरात साहेबांना सांगितलं की, तुम्ही सुधीर तांबेंशी बोला. मी त्यांनाही बोललो की, बाळासाहेबांचंही मत आहे. तुम्ही फॉर्म भरा. नतंर आपण त्यावर बोलू. ते म्हणाले की, ठीक आहे मी फॉर्म भरायला चाललो आहे.

त्याच्या चार-पाच दिवस आधी प्रदेश काँग्रेसची मीटिंग झाली. त्यातही त्यांना मला सांगता आलं असतं पण त्या मीटिंगला देखील ते आले नाही. बाळासाहेबांना लागलेलं असताना ते मीटिंगला आले नव्हते. सुधीर तांबेंना येता आलं असतं. पण ते मीटिंगला आले नाही. ऐनवेळवर पक्षाला आपल्या घरचा पक्ष आहे असं समजणं आणि सुधीर तांबे असतील कोणीही असेल मी असेल की, असंख्य कार्यकर्त्यांचं योगदान मला निवडून आणण्यात असतं. ते विचाराला मतदान करत असतात. पण त्याला गृहीत धरून चालावं आणि आम्हीच इथले मालक आहोत अशा पद्धतीची व्यवस्था व्हावी, पक्षाला काहीच न समजावं असं होऊ शकत नाही.

पक्षाची काही नियमावली तयार करण्यात आल्या आहेत. आता ते लोकं पक्षात एवढी वर्ष होते. आता तांबे परिवार पक्षात नाही. पण त्या नियमावलीचा देखील त्यांना अभ्यास नसेल तर मग ही गंभीर बाब आहे.

12 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत जे घडलं शेवटच्या क्षणापर्यंत घडलं. हे पहिले समजलं असतं तर आम्ही वेगळी तयारी केली असती. सांगितलं असतं तर.. पण बाहेर येऊन ज्या पद्धतीने सत्यजीत तांबेंनी जे वक्तव्य केलं की, मी कोणाचाही पाठिंबा घेऊ शकतो. याचा अर्थ तुमची भूमिका जी आहे ती स्पष्ट झाली आणि जेव्हा 2014 पासून जे मोदींचं सरकार केंद्रात आलं तेव्हापासून हे जे संस्थानिक राजकारण्यांची परिस्थिती आपण पाहिली त्यामध्ये कोट केलं पाहिजे आता.. हर्षवर्धन पाटील यांनी एका जाहीर सभेत सांगावं की, ‘बरं झालं मी भाजपमध्ये आलो नाही तर मी पण जेलमध्ये असतो.’

आम्ही संस्थानिकांनाही वाढवलं असेल तर आम्ही गरीबांना देखील मोठं केलं. काही लोकांची परिस्थिती नव्हती तरी ते लोकं सत्तेत आले आणि ते काय आहेत ते आपणं पाहतोय. सिंधियांपासून अनेक लोकं आहेत देशभरात अशी.

काँग्रेसने सर्व लोकांनाच सोबत घेऊन चालायची भूमिक मांडली. त्यात काँग्रेसचं चुकलं असं म्हणता येणार नाही. कोणाच्या मनात चुकीचं असेल. ते सांगत असतील आम्ही काँग्रेसचे आहोत पण त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर आम्ही काय भविष्य सांगणारे पक्ष नाहीत.

भविष्य सांगणारा पक्ष तर आता सत्तेत आहे. म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे अशी आहे की, जे काही झालं त्याने पक्षाची मानहानी झाली. सुधीर तांबेंनी आम्हाला पहिले सांगितलं असतं, विश्वासात घेतलं असतं. तर आम्ही सत्यजीत तांबेंनाही सांगितलं असतं.

तिकीटाची प्रक्रिया ही काही एका दिवसात होत नाही. आमची बैठक झाली. त्यात सुशीलकुमार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि मी होतो. हे सगळे लोकं होते. आमची यावर चर्चा झाली की, सुधीर तांबेंचं नाव निश्चित झालं तेव्हा ते तिथे हजर होतेच. त्यावेळेसही बाळासाहेबांना भूमिका मारता आली असती की, नाही सुधीर तांबेंना तिकीट देऊ नका. अमुकाला द्या.. असं म्हणता आलं असतं.

प्रश्न: काँग्रेसमध्ये संस्थानिक राजकारणी भरपूर राहिले आहेत. तर तुमची लढाई या सगळ्या घराण्यांसोबत आहे का?

नाना पटोले: आज जी काही राहुल गांधींच्या लढाईत लोकं सामील झाले आहेत कोणी आपल्या कर्माने मोठा झाला असेल तो आजही काँग्रेस विचाराने प्रेरीत आहे. पण स्वत:ला वाचविण्यासाठी.. म्हणून मी हर्षवर्धन पाटलांना कोट केलं. जी कोणी मंडळी असतील..

लोकं आता ओळखून आहे. मी जनतेमुळे नेता होतो. संस्थानिक असला तरी तो काही लोकांच्या घरच्या चुली पेटवायला नाही जात. ज्या पक्षाने तुम्हाला स्थान दिलं, महत्त्व दिलं.. त्या पक्षाच्या अडचणीच्या काळात सोबत राहणं गरजेचं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT