”आमची काही नॅचरल आघाडी नाही”; नाना पटोलेंनी दिले महविकास आघाडीच्या फुटीचे संकेत

मुंबई तक

इसरार चिस्ती औरंगाबाद: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करावं असं म्हणत एकनाथ शिंदे आणि सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडावी आम्ही लगेच परत येतो असे बंडखोर म्हणत होते. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडली नाही. आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

इसरार चिस्ती

औरंगाबाद: शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फारकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करावं असं म्हणत एकनाथ शिंदे आणि सेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडावी आम्ही लगेच परत येतो असे बंडखोर म्हणत होते. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र राष्ट्रवादी-काँग्रेसची साथ सोडली नाही. आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आहेत.

आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारलं जात नसेल तर आम्ही चर्चा करू असे म्हणत नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत दिले आहेत.

आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही- नाना पटोले

शेतकऱ्यांना शिंदे सरकारनं हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याचे कालच्या बैठकीत जाहीर केले आहे. यावर नाना पटोले म्हणाले ”अधिवेशनात आम्ही मुद्दा मांडू. 75 हजार हेक्टरी मदत द्यायला हवी होती. शेतकऱ्याला चांगली मदत द्यायला हवी हे सरकार लॉलीपॉप देत आहे. येणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीने सोबत लढव्या की नाही याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही”.

हे वाचलं का?