नाशिक : ग्रामसेवक निघाला सोनसाखळी चोर; सुटीच्या दिवशी करायचा चेनस्नॅचिंग
परिस्थिती कधी कुणाला काय करायला लावेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना घडली आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये नंबरप्लेट नसलेल्या प्लेजर मोपेडवरून गंगापूर रोडवरील भाजी बाजार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, तो अट्टल चेनस्नॅचर निघाला. पण, आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे चेनस्नॅचिंग करणारा हा व्यक्ती शिकाऊ ग्रामसेवक आहे. शिकाऊ ग्रामसेवक पदावर असलेल्या या आरोपीविरुद्ध चेनस्नॅचिंगचे […]
ADVERTISEMENT

परिस्थिती कधी कुणाला काय करायला लावेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना घडली आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये नंबरप्लेट नसलेल्या प्लेजर मोपेडवरून गंगापूर रोडवरील भाजी बाजार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणार्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असता, तो अट्टल चेनस्नॅचर निघाला. पण, आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे चेनस्नॅचिंग करणारा हा व्यक्ती शिकाऊ ग्रामसेवक आहे.
शिकाऊ ग्रामसेवक पदावर असलेल्या या आरोपीविरुद्ध चेनस्नॅचिंगचे पाच गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 94 हजार 859 रुपये किमतीच्या सोन्याच्या 11 लगडी जप्त केल्या आहेत.
आरोपी कसा अडकला जाळ्यात?
ग्रामसेवक म्हणून नोकरीला असलेला आरोपी अनेक महिन्यांपासून चेनस्नॅचिंग करत असल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. 15 डिसेंबर रोजी पोलीस मित्र असलेल्या नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोळसे व अंमलदार जाधव यांना एक व्यक्ती संशयास्पद रीतीने गंगापूर-आकाशवाणी टॉवर परिसरात विनानंबर प्लेटच्या मोपेडवरून फिरत आहे, अशी माहिती दिली.










