Vashi Suicide Case: वाशीमध्ये एकाच कुटुंबातील तीन ज्येष्ठ नागरिकांची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

निलेश पाटील, नवी मुंबई

ADVERTISEMENT

नवी मुंबईतील वाशी येथे एकाच घरातील तीन ज्येष्ठ नागरिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशी सेक्टर 4 येथील माऊली सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी कामवानी (वय 87 वर्ष), कांता कामवानी (वय 63 वर्ष) आणि दिलीप कामवानी (वय 67 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तिघांची नावं असल्याचं समजतं आहे. राहत्या घरी विष प्राशन करून आई, मुलगा व मुलगी यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हे वाचलं का?

29 तारखेला सकाळी या तिघांनीही उंदीर मारण्याचं विष पिऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. यासंदर्भातील महिती वाशी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ तिघांनाही मनपा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

कांता आणि दिलीप कामवानी हे दोघेही भाऊ-बहीण गेली अनेक वर्ष आपल्या आईसोबतच राहत होते. दोघेही अविवाहित होते. तिघेही वयस्कर असल्याने त्यांना दिवसेंदिवस अधिक आर्थिक चणचण भासत होती. अशी माहिती वाशी पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कामवानी कुटुंबीय नैराश्येत होते. या नैराश्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

ADVERTISEMENT

काळीज पिळवटून टाकणारी घटना, पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने पतीची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्याने आगारातील बसला गळफास घेत संपवलं आयुष्य

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्यांने बसलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती.

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरातच एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची तिसरी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली.

एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप काकडे यांनी शेवगाव आगारात उभ्या असलेल्या बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आगारातील इतर कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर पोलीसही घटना काकडे यांनी गळफास घेतलेल्या ठिकाणी पोहोचले. दिलीप काकडे यांच्या आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT