‘पोलिसांची माफी माग, नाहीतर तुला…;’ नवनीत राणांना पोलीस पत्नीने दिला इशारा
खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांच्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी केली आहे. यादरम्यान त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला आहे. दोन दिवसात पोलिसांची माफी मागीतली नाही तर सोडणार नाही, असा इशारा वर्षा भोयर यांनी नवनीत यांना दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच चिघळताना दिसत आहे. […]
ADVERTISEMENT

खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांच्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी केली आहे. यादरम्यान त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला आहे. दोन दिवसात पोलिसांची माफी मागीतली नाही तर सोडणार नाही, असा इशारा वर्षा भोयर यांनी नवनीत यांना दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच चिघळताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी हुज्जत घातली होती. एक तरुणी बेपत्ता झाली होती. कथित लव्ह जिहादमध्ये तिला फसवण्यात आलंय. तरुणावर कारवाई करण्यात यावी, यासाठी नवनीत राणा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर बेपत्ता तरुणी सातारा येथे मिळून आली. ‘आईवडिलांशी वाद झाला होता. शिक्षण घेण्यासाठी मी घरातून रागाच्या भरात निघून गेले होते. मला कुणीही पळवून नेलं नाही आणि लग्नही केलं नाही. माझी बदनामी थांबवा. नवनीत राणांनी खोटी माहिती दिली आहे. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून माझी बदनामी केली जात आहे”, असा आरोप या तरुणीने केला आहे.
त्यानंतर विविध स्तरावरून नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी राणा यांच्यावर गुन्हा करावं अशी मागणी पोलीस बॉईज यांच्याकडून करण्यात आली आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली बेताल वक्तव्य करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राणा यांनी केला आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बीडचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी केली आहे.