नवाब मलिक यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, म्हणाले…
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नीरज गुंडे हा मागील सरकारमधला दलाल आहे. आज हा दलाल माझ्यावर आरोप करतो आहे. ज्याच्या चेंबूरमधल्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे आणि ज्या माणसाला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नीरज गुंडे हा मागील सरकारमधला दलाल आहे. आज हा दलाल माझ्यावर आरोप करतो आहे. ज्याच्या चेंबूरमधल्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे आणि ज्या माणसाला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं असं म्हणत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं.
आणखी काय म्हणाले नवाब मलिक?