SRK’s Son: आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून NCB ने आखली नवी रणनीती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एनसीबीने कोर्टात सांगितलेलं, ‘आर्यनकडे काहीही सापडले नाही’

ADVERTISEMENT

आर्यन खान आणि इतर आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होती. दरम्यान, एनसीबीने न्यायालयात हे कबूल केलं होतं की, त्यांना आर्यनकडे कोणतेही ड्रग्स आढळून आलेले नव्हते. असे असूनही, एजन्सीने 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने असे म्हटले की, ‘आम्ही तुम्हाला आधीच खूप वेळ दिला आहे.’ यानंतर आर्यनसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधून पकडलं होतं, त्यानंतर दीर्घ चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली होती.

दरम्यान, काल (7 ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता आज (8 ऑक्टोबर) त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, आर्यनला जामीन मिळू नये यासाठी आता NCB देखील जोरदार प्रयत्न करणार असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

कोर्टातील सुनावणी काल रात्री उशिरा संपल्याने आणि आरोपीचा कोव्हिड रिपोर्ट उपलब्ध नसल्याने त्यांना तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आले.

या प्रकरणी आज (शुक्रवारी) पुन्हा सुनावणी होणार असून, त्यासाठी तपास यंत्रणेने महत्त्वाची रणनीती तयार केली आहे. एजन्सीचे अधिकारी आर्यन खानची जामिनावर सुटका होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, ड्रग्सचे संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्यासाठी त्यांना आर्यनची कस्टडी हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत आर्यनला जामीन मिळू नये यासाठी NCB ने बरीच तयारी केली आहे.

ADVERTISEMENT

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या जामीन अर्जाला NCB विरोध करेल. या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून जामिनावर सुटू नयेत अशीच एनसीबीची इच्छा आहे.

ADVERTISEMENT

मात्र, असं असलं तरी असं म्हटलं जात आहे की, आर्यन, अरबाज आणि मुनमुन धामेचा यांना आता या प्रकरणात सुनावणीनंतर दंडाधिकारी न्यायालय जामीन मंजूर करु शकतं, कारण त्यांच्याकडून कमर्शियल क्वॉंटिटीमध्ये ड्रग्स सापडलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात आर्यन खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे एनसीबीने एक रणनीती आखत असं ठरवलं आहे की, आर्यन खानच्या लीगल टीमला कोर्टात सुनावणीदरम्यान जोरदात टक्कर द्यायची.

एनसीबीने कोर्टात सांगितलेलं, ‘आर्यनकडे काहीही सापडले नाही’

आर्यन खान आणि इतर आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होती. दरम्यान, एनसीबीने न्यायालयात हे कबूल केलं होतं की, त्यांना आर्यनकडे कोणतेही ड्रग्स आढळून आलेले नव्हते. असे असूनही, एजन्सीने 11 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने असे म्हटले की, ‘आम्ही तुम्हाला आधीच खूप वेळ दिला आहे.’ यानंतर आर्यनसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Sharad Pawar: क्रूझ ड्रग्स प्रकरणात पवारांचा NCB ला ‘एक’ थेट सवाल, काय म्हणाले पवार?

क्रूझ ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत एकूण 18 लोकांना अटक

या महिन्याच्या सुरुवातीलाच NCB च्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला. एनसीबीला रेव्ह पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. ज्यात ड्रग्जचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे अधिकारी तिकिटं खरेदी करुन क्रूझवर गेले होते आणि तिथेच छापा मारुन त्यांनी आर्यनसह अनेकांना पकडलं होतं.

या प्रकरणी आतापर्यंत काही परदेशी नागरिकांसह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे म्हणाले, ‘एकूण 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक परदेशी नागरिकही आहे. या व्यतिरिक्त कमर्शियल क्वॉंटिटी देखील जप्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT