रडीचा डाव ! ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर शरद पवारांनी संतप्त प्रतिक्रीया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपची झुंज मोडून काढत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात रंगतदार लढाई सुरु होती. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये पिछाडीवर पडलेल्या ममता बॅनर्जींनी नंतर चांगलं पुनरागमन करत विजय मिळवला. परंतू यानंतर निवडणूक आयोगाने सुवेंदू अधिकारी विजयी झाल्याची घोषणा केली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा रडीचा डाव असल्याचं म्हणत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

ADVERTISEMENT

बंगालमधल्या मतदारांनी ममता दीदींना भरभरुन पाठींबा दिला. हा निकाल मोठ्या मनाने स्विकारायला हवा होता परंतू ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला रडीचा डाव असं म्हणता येईल. अशी प्रतिक्रीया शरद पवारांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात असतानाही ममता बॅनर्जींनी अखेरपर्यंत हार न मानता भाजपचं आव्हान परतावून लावलं. दरम्यान, बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयात मोलाची भूमिका निभावणाऱ्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील निकालांवर महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊत म्हणतात दीदी ओ दीदी…पवारांनीही दिल्या शुभेच्छा, राज्यातील नेत्यांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

हे वाचलं का?

तृणमूल काँग्रेसमध्ये जी लोकं पक्षासाठी डोईजड झाली होती. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुंडागर्दीचे आरोप होते अशा लोकांना भाजपने आपल्या पक्षात स्थान दिलं आणि या लोकांच्या जोरावर ते विजयाचं स्वप्न पाहत होते. मीडियानेही ही लोकं सोडून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसला भगदाड, पक्ष संपला…अशा बातम्या चालवल्या. पण प्रत्यक्षात ममता दीदींच्या पक्षातला हा कचरा होता तो भाजपने उचलला. ही लोकं सोडून गेल्याचा तृणमूल काँग्रेसला फटका बसेल असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता परंतू तसं झालं नाही.” प्रशांत किशोर इंडिया टुडेशी बोलत होते.

पश्चिम बंगालचे निकाल येण्याआधी प्रशात किशोर यांनी इंडिया टुडेशी बोलत असताना भाजपने बंगालमध्ये तीन आकडी संख्या पार केली तर मी आता जे काम करतोय ते सोडून देईन असं वक्तव्य केलं. बंगालमध्ये दुपारपर्यंतचे कल पाहता प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने २०१९ च्या निवडणूकीत केलेल्या चुका यंदा करायच्या नाहीत हे ठरवून रणनिती आखली ज्याचा फायदा पक्षाला झाल्याचंही किशोर यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT