उद्घाटन न करता निघून जावं असं वाटलं पण…राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तुफान गर्दीवर अजित पवारांची नाराजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उप-मुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार जनतेला सूचना देत असताना गर्दी करणं टाळा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन करत असतात. परंतू पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात आज सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन झालेलं पहायला मिळालं. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त केली जात असताना, अजित पवारांनीही आपल्या भाषणात या […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उप-मुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार जनतेला सूचना देत असताना गर्दी करणं टाळा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन करत असतात. परंतू पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात आज सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन झालेलं पहायला मिळालं. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त केली जात असताना, अजित पवारांनीही आपल्या भाषणात या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
“मला प्रशांतने १० तारखेला सांगितलं होतं की कार्यक्रमाला भेट द्या. माझ्या स्वतःच्या मनात होतं की शरद पवार साहेबांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं वातावरण पाहता असं झालं नाही. गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असं वाटलं होतं. पण मग कार्यकर्ते नाराज झाले असते. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं पालन करुन कार्यक्रम झाला पाहिजे. एकीकडे आम्ही जनतेला आवाहन करतो की नियम पाळा आणि आम्हीच अशा कार्यक्रमात जातो. मला इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशी माझी अवस्था झाली. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.” अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन झाल्याबद्दल कारवाई होणार का असं विचारलं असता अजित पवारांनी आयोजकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत असं सांगितलं. सकाळी सात वाजता कार्यक्रम केला असता तर गर्दी कमी आली असती असंही अजित पवार या कार्यक्रमात म्हणाले.
हे वाचलं का?
दरम्यान, पुण्यात शनिवार आणि रविवारी Weekend Lockdown असणार आहे अशी महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. शनिवार आणि रविवार पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढते आहे या गर्दीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातून बाहेर फिरायला जाणारे लोक पुण्यात परततील तेव्हा त्यांना पंधरा दिवस क्वारंटाईन केलं जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं.
पुण्यात शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शनिवार आणि रविवार पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढते आहे या गर्दीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT