अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिलं पत्र
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांवर चहूबाजूंनी टीका होतोय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं आता अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्या मागणी केलीये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह […]
ADVERTISEMENT

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांवर चहूबाजूंनी टीका होतोय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं आता अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्या मागणी केलीये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली.
अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन पत्र दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की,”छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती, इथली संस्कृती आणि परंपरा ही आईसमान समजली जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीचा इशारा! “२४ तासात अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा नाहीतर…”