‘कात्रज डेअरी’ शिंदे सरकारच्या रडारवर; हिवाळी अधिवेशनापूर्वी अजित पवारांना मोठा धक्का

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या दूध संघात गैरकारभार झाल्याच्या भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खंडारे यांच्या तक्रारीवरुन सहकार मंत्री अतुल सावे आणि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या चौकशीसाठी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिरपूर्कर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. तसंच चौकशी करून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देशही या समितीला देण्यात आले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीमध्ये संचालक मंडळाच्या १६ जागांपैकी १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर अन्य दोनपैकी एका जागेवर काँग्रेसने आणि दुसऱ्या जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला आहे. त्यामुळे कात्रज दूध डेअरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व कायम राहिले आहे.

हे वाचलं का?

५ सदस्यीय समिती करणार चौकशी :

नाशिकचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत शिरपूर्कर यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये पुणे विभागीय उपनिबंधक (दुग्ध) महेश कदम, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागाचे पुण्यातील जिल्हा विशेष लेखापरिक्षक अनंत आढारी, दुग्धचे लेखापरिक्षक नितीन देशमुख यांचा समावेश आहे. तसंच पुणे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एस.के. डोईफोडे हे सदस्य सचिव आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT