Rohit Pawar यांची फडणवीसांवर टीका! ‘खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची जुनी सवय’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल दरवाढ होते आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर काँग्रेसकडून विरोधकांकडून सातत्याने टीका होते आहे. आजच पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 106 रूपये प्रति लिटर इतकं झालं आहे. काँग्रेसने राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे महागाईही वाढते आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी विचारलं असता ते म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राने जो टॅक्स लावण्यात आला आहे त्यातले 12 रूपये राज्यांना मिळतात. राज्य सरकार 30 रूपये टॅक्स लावतं. समजा शंभर रूपये लिटर पेट्रोल असेल तर त्यातले 42 रूपये राज्यांना मिळतात. ते त्यांनी कमी करावेत म्हणजेच पेट्रोलचे दर कमी होतील. असं उत्तर फडणवीस यांनी दिलं होतं. अशात आता रोहित पवारांनी यावरच टीका केली आहे.

काय आहे रोहित पवार यांचं ट्विट?

‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही.’ अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर ‘केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगता.’ असा टोला रोहीत पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. एवढंच नाही तर विरोधकांना जर साडेतीन पैशांच्या ठिकाणी 12 रूपये दिसत असतील तर त्याला काय म्हणावं? सगळीकडे आणि अधिवेशनात बाराचाच आकडा दिसत असेल त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं हे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही. असंही रोहित पवार यांनी सुनावलं आहे.

शुक्रवारी याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी फडणवीस म्हणत आहेत त्याला काही अर्थ नाही असंच उत्तर दिलं होतं. ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मीच अर्थ खातंही सांभाळतो आहे. आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर कोणतेही नवे कर लावलेले नाहीत. जे काही कर घेतले जातात ते फडणवीस सरकार असतानाच्या काळातलेच आहेत. त्यामध्ये आम्ही कोणताही बदल केलेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT