सचिन वाझेंच्या CIU युनिटमधील सहकाऱ्यांनाही NIA अटक करण्याची शक्यता

मुंबई तक

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. २५ मार्चपर्यंत सचिन वाझे यांना NIA कस्टडीत सोपवलं आहे. यानंतर NIA सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या CIU (Crime Intelligence Unit) मधील सहकाऱ्यांनाही अटक करण्याची शक्यता आहे. वाझे यांचे सहकारी असलेले API रियाज काझी यांचीही NIA चौकशी करत आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. २५ मार्चपर्यंत सचिन वाझे यांना NIA कस्टडीत सोपवलं आहे. यानंतर NIA सचिन वाझे यांच्यासोबत काम करणाऱ्या CIU (Crime Intelligence Unit) मधील सहकाऱ्यांनाही अटक करण्याची शक्यता आहे. वाझे यांचे सहकारी असलेले API रियाज काझी यांचीही NIA चौकशी करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्याघराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत अनेक बनावट नंबरप्लेट सापडल्या होत्या. या सर्व नंबरप्लेट वाझे यांच्या सहकाऱ्यांनी विक्रोळीमधून तयार केल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी वाझे यांच्या सहकाऱ्यांची NIA च्या मुंबई ऑफिसमध्ये चौकशी होत आहे. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात वाझे यांचा रोल असल्याचा NIA च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. याच कारणासाठी वाझे यांची कस्टडी NIA ने मागितली होती.

अंबानीच्या घरासमोरील स्कॉर्पिओ ही ज्या मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती त्यांचा मृतदेहही मुंब्रा खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. १७ फेब्रुवारीला हिरेन यांची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली होती. ज्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली होती. १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या काळात ही स्कॉर्पिओ कार नेमकी कुठे होती, ती कोण वापरत होतं, याबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. एनआयए तसंच एटीएसचे अधिकारीही याचाच तपास करत आहेत. याबद्दल आता NIA च्या अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ही स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांच्या ताब्यात असल्याचा संशय NIA आणि ATS च्या अधिकाऱ्यांना आहे. सचिन वाझे यांनी ही कार आपल्या सोसायटीच्या आवारात ठेवल्याचा संशयही तपासयंत्रणांना आहे. सचिन वाझे हे ठाण्यात राहतात, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा सध्या वाझे यांच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp