सचिन वाझेंना घेऊन NIA कडून महत्वाच्या जागांवर Crime Recreation

दिव्येश सिंह

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंना घेऊन NIA ने पुन्हा महत्वाच्या ठिकाणांवर क्राईम रिक्रेएशन केलं. रात्री १० वाजल्याच्या दरम्यान वाझेंना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकावर नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. CSMT स्थानकावर फॉरेन्सिक विभागाची एक टीम आधीच हजर होती. पोलिसांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेंना घेऊन NIA ने पुन्हा महत्वाच्या ठिकाणांवर क्राईम रिक्रेएशन केलं. रात्री १० वाजल्याच्या दरम्यान वाझेंना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकावर नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. CSMT स्थानकावर फॉरेन्सिक विभागाची एक टीम आधीच हजर होती. पोलिसांनी यासाठी रात्री रेल्वे स्टेशनवर मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Crime Recreation पाठीमागे NIA ची थेअरी काय आहे?

४ मार्च रोजी सचिन वाझे यांनी CSMT रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेन पकडली आणि ते कळवा स्थानकात गेले. यादरम्यान त्यांनी मनसुख हिरेन यांना फोन करुन आपल्याला कळवा रेल्वे स्थानकात भेट असं सांगितलं. घरच्यांना माझा फोन आला आहे हे कळू देऊ नको, कांदिवलीवरुन कोणीतरी तावडे नावाचा पोलीस अधिकारी भेटायला बोलावतो आहे असं सांगायला सांगितलं. यावेळी कळवा स्टेशनला पोहचल्यानंतर सचिन वाझेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मनसुख हिरेन यांना कारमध्ये बेशुद्ध केलं. ज्यानंतर विनायक शिंदेच्या मदतीने मनसुख यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत टाकण्यात आल्याचा NIA ला संशय आहे. याच दिवशी आपण मुंबईत असल्याचं दाखवण्यासाठी सचिन वाझेंनी रात्री डोंगरी येथील एका बारवर रेड केली होती.

दरम्यान, क्राइम रिक्रिएशनदरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यावेळी जवळून शूट करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. सचिन वाझेंना अटक केल्यानंतर या प्रकरणात NIA च्या हाती अनेक महत्वाचे पुरावे आले आहेत. हे पुरावे योग्य आहेत हे सिद्ध करण्यासाठी CSMT स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ च्या भागात घेऊन गेली. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरुन जिकडून वाझेंनी लोकल ट्रेन पकडली त्या भागात सचिन वाझेंना अनेकदा चालायला लावून NIA ने Crime Recreation केलं. यावेळी फॉरेन्सिक टीमने त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्या. यानंतर वाझे यांना घेऊन NIA ची टीम मुंब्रा-कळवा भागाच्या दिशेने निघाली. मुंब्रा खाडीतच मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता.

CSMT स्थानकातली प्रक्रीया पूर्ण पडल्यानंतर NIA चे अधिकारी सचिन वाझेंना घेऊन कळवा रेल्वे स्थानकात पोहचले. इथेही सुमारे ४५ मिनीटं सचिन वाझेंना विविध पद्धतीने चालायला लावत NIA ने क्राइम रिक्रिएशन केलं. ज्यानंतर रात्री २ वाजल्याच्या सुमारास सचिन वाझेंना पुन्हा NIA च्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं. सध्या NIA चे अधिकारी स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूत सचिन वाझेंच्या असलेल्या सहभागाबद्दल तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp