मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना कोर्टाने नाकारला जामीन
भाजप आमदार नितेश राणे यांचा नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता नितेश राणे या प्रकरणी हायकोर्टात […]
ADVERTISEMENT

भाजप आमदार नितेश राणे यांचा नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता नितेश राणे या प्रकरणी हायकोर्टात जाणार आहेत असं नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
नितेश राणे अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामिनासाठी अर्ज करु असंही त्यांनी म्हटलं आहे.
आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. शिवसेना शाखेसमोर शिवसैनिक मोठ्याप्रमाणात जमले आणि त्यांनी फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांना आवाहन केलं आहे. नारायण राणे यांनी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर होण्यास सांगावं, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.