संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अखेर दिलासा! न्यायालयाकडून जामीन मंजूर
-भरत केसरकर, सिंधुदुर्ग गेला महिनाभरापासून संतोष परब हल्ला प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या आमदार नितेश राणे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आज नितेश राणे यांना नियमित जामीन मंजूर केला. याप्रकरणात नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले होते. भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. […]
ADVERTISEMENT

-भरत केसरकर, सिंधुदुर्ग
गेला महिनाभरापासून संतोष परब हल्ला प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या आमदार नितेश राणे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आज नितेश राणे यांना नियमित जामीन मंजूर केला. याप्रकरणात नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले होते.
भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलत्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणेंना कणकवलीमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आठवड्यातून म्हणजे सोमवारी पोलिसांत हजेरी लावावी लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीच्या काळात शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप करण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हा हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून, करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला होता.
18 डिसेंबर 2019 रोजी संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यापासून म्हणजे मागील दीड महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे प्रकरण चालू आहे. नितेश राणे यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात पहिल्यादा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. डिसेंबरअखेरीस त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
त्यानंतर 17 जानेवारी रोजी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही नितेश राणे यांचा जामीन फेटाळून लावला होता. उच्च न्यायालयानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु 27 जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगत सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला होता.
खालच्या न्यायालयासमोर शरण जाण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांचं संरक्षण नितेश राणे यांना दिल होतं. त्यानंतर नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची (४ फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 14 दिवसांची (18 फेब्रुवारीपर्यंत) न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
दरम्यान, नितेश राणे यांनी शुक्रवारी जामीनासाठी अर्ज केला होता. याच काळात त्यांची प्रकृतीही बिघडली. त्यामुळे त्यांना आधी जिल्हा आरोग्य रुग्णालयात, तर नंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.