नितीश कुमार आठव्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री, कसा आहे २२ वर्षांचा प्रवास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत राजीनामा दिला. त्यानंतर आता आज नितीश कुमार राजद आणि काँग्रेस तसंच मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आठव्यांदा शपथ घेतील. बिहारमध्ये युती, आघाडीचे प्रयोग झाले. मात्र तो प्रयोग टिकला नाही, नितीश कुमार मात्र टिकले. १ मार्च २००० या दिवशी नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

ADVERTISEMENT

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आत्तापर्यंत ८ वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

१ मार्च २००० या दिवशी पहिल्यांदा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री झाले

२ नोव्हेंबर २००५ या दिवशी नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

हे वाचलं का?

३ नोव्हेंबर २०१० या दिवशी नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले

४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी नितीश कुमार चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले

ADVERTISEMENT

५ नोव्हेंबर २०१५ या दिवशी नितीश कुमार पाचव्यांचा बिहारचे मुख्यमंत्री झाले

ADVERTISEMENT

६ जुलै २०१७ या दिवशी नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

७ नोव्हेंबर २०२० या दिवशी नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

१० ऑगस्ट २०२२ या दिवशी आता पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री

बिहारचं राजकारण २०१० पासून कसं बदललं?

बिहारमध्ये झालेल्या मागच्या तीन निवडणुकांचा विचार केला तर त्याचा निष्कर्ष हा निघतो की ज्या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक जिंकली ते पाच वर्षे सत्तेत राहू शकले नाही. मात्र नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

२०१० ला जदयू आणि भाजप एकत्र आले होते मात्र २०१३ मध्ये त्यांची युती तुटली. २०१५ मध्ये जदयू आणि राजद यांची युती झाली आणि निवडणूक लढवली गेली मात्र २०१७ मध्ये ही युती तुटली. २०२० मध्ये जदयू आणि भाजप यांनी निवडणूक एकत्र लढवली मात्र २०२२ मध्ये ही युतीही तुटली. हे सगळं घडलं तरीही मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच कायम राहिले ही बाब विशेष आहे. आता आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार ८ व्यांदा शपथ घेतील.

भाजपवर नितीश कुमार यांची कडाडून टीका

जदयूच्या आमदारांची बैठक नितीश कुमारांनी बोलावली होती त्या बैठकीत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. भाजपने आपल्याला संपवण्याचा कट रचला होता. भाजपकडून आपल्याला संपवण्याचे प्रयत्न सुरू होते असंही नितीश कुमार यांनी म्हटलं होतं.

जदयू आणि भाजपची युती का तुटली?

बिहारमध्ये जो राजकीय भूकंप झाला त्याचं कारण नेमकं काय आहे? हा प्रश्न उपस्थित होतोच आहे. नितीश कुमार हे महाआघाडी सोडून भाजपसोबत आले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली. नितीश कुमार यांच्या नाराजीचं मुख्य कारण फ्री हँड न मिळणं आहे. त्यामुळेच ते दिल्ली सरकारच्या कार्यक्रमांमध्येही कधी सहभागी झाले नाहीत. त्यांनी राज्यातही भाजपच्या नेत्यांसोबत सुरक्षित अंतर ठेवलं. RCP सिंह सारख्या नेत्यांनी जदयूऐवजी भाजपशी केलेली सलगी नितीश कुमार यांना मुळीच आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पडली.

RCP सिंह यांचा नेमका विषय काय?

जदयूचे माजी अध्यक्ष RCP सिंह हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना जदयूमध्ये भाजपचा माणूस म्हणून पाहिलं जाऊन लागलं. कारण नितीश कुमार यांची मर्जी जाणून न घेता ते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवरही पाठवलं नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी पक्षही सोडला. या चॅप्टरनंतर भाजप आणि जदयू म्हणजेच नितीश कुमार यांच्यातलं अंतर वाढत गेलं. त्याचा परिणाम आता भाजपला धक्का देण्यात झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT