आयएनस विक्रांतमध्ये एक दमडीचा गैरव्यवहार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार उद्धट-सोमय्या

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज प्रसारमाध्यमांसमोर हजर झाले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मी बॉम्बे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. मला त्यांनी मला नुसता दिलासा दिला नाही तर जो प्रश्न मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो आहे. मुंबई पोलिसांना माफियासारखं सरकार वागवत आहे. धाक दाखवायचा, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या आज प्रसारमाध्यमांसमोर हजर झाले. त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मी बॉम्बे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मी आभार मानतो. मला त्यांनी मला नुसता दिलासा दिला नाही तर जो प्रश्न मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो आहे. मुंबई पोलिसांना माफियासारखं सरकार वागवत आहे. धाक दाखवायचा, खोटे आरोप करायचे हेच नाटक सुरू आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

भर पत्रकार परिषदेत जोडा काढत किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत तुम्ही खुशाल….

उद्धव ठाकरे यांनी एक लक्षात ठेवावं की त्यांचे डर्टी डझन मंत्र्यांच्या विरोधात मी बोलणारच. त्यांना शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. आम्हाला खात्री होती की मुंबई पोलिसांना विचारलं जाईल की FIR कोणत्या आधारावर घेतली गेली? नेमकं तेच घडलं. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. यशवंत जाधव, हसन मुश्रीफ आणि अनिल परब या तिघांसाठीचा होमवर्क मी केला आहे. त्यासाठीच नॉट रिचेबल होतो असंही किरीट सोमय्यांनी हसत हसत सांगितलं.

संजय राऊत जे काही आरोप करत होते त्यात त्यांनी एकही कागद दाखवलं नाही. या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाईंड उद्धव ठाकरे आहेत. संजय राऊत फक्त बोलविते धनी आहेत. कोर्टाने आम्हाला दिलासाच दिला नाही तर त्यांनी प्रश्न उपस्थित केले ते एक प्रकारे बरंच झालं असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ५८ कोटींचा घोटाळा झाला असा आरोप केला जातो त्यासाठी कुठला आधार आहे? कुठला पुरावा आहे?

उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या

उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मनी लाँड्रींग केलं आहे असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार हे उद्धट सरकार आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. INS विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा दाखल केल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते. मात्र आज ते प्रसारमाध्यमांसमोर आले आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp