प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती
माजी केंद्रीय कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र आणि भारतामधील निष्णात वकीलांपैकी एक मानले जाणाऱ्या महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनानंतर राज्यसभेतली एक जागा रिकामी झाली होती, त्या जागेवरती जेठमलानी यांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणऊन जेठमलांनी यांचा कार्यकाळ मे २०२४ पर्यंत असणार आहे. याआधी महेश जेठमलानी हे […]
ADVERTISEMENT
माजी केंद्रीय कायदेमंत्री राम जेठमलानी यांचे पुत्र आणि भारतामधील निष्णात वकीलांपैकी एक मानले जाणाऱ्या महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनानंतर राज्यसभेतली एक जागा रिकामी झाली होती, त्या जागेवरती जेठमलानी यांची नियुक्ती झाली आहे.
ADVERTISEMENT
राज्यसभेवर खासदार म्हणऊन जेठमलांनी यांचा कार्यकाळ मे २०२४ पर्यंत असणार आहे. याआधी महेश जेठमलानी हे भाजपशी निगडीत होते. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतही काम केलं आहे. २०१२ साली तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर महेश जेठमलानी यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.
गेल्या वर्षापासून महेश जेठमलानी यांना राज्यसभेवर नियुक्त केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरु होती. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT