ओमिक्रॉनचा कहर.. ब्रिटनमध्ये एका दिवसात तब्बल 78,610 नवे रुग्ण, भारतात येऊ शकते लॉकडाऊनची वेळ?
लंडन: कोविड-19 (Covid-19) चा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) आता जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे. एकीकडे या व्हेरिएंटमुळे ब्रिटनमधील कोरोनाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तर त्याच वेळी अमेरिकेतही एका दिवसात कोव्हिडचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. ब्रिटनमध्ये बुधवारी तब्बल 78,610 नवे रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. तब्बल 12 […]
ADVERTISEMENT

लंडन: कोविड-19 (Covid-19) चा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) आता जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे. एकीकडे या व्हेरिएंटमुळे ब्रिटनमधील कोरोनाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तर त्याच वेळी अमेरिकेतही एका दिवसात कोव्हिडचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. ब्रिटनमध्ये बुधवारी तब्बल 78,610 नवे रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. तब्बल 12 महिन्यांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला 8 जानेवारी रोजी 68,053 रुग्ण सापडले होते. पण तेव्हा ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू होता.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे की, ओमिक्रॉनचे रुग्ण आता दुप्पट वेगाने वाढत आहेत. ते रोखण्यासाठी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की आपल्याला बूस्टर डोस देखील वाढवावा लागेल. कारण त्या एका गोष्टीमुळेच आपण या संसर्गाचा सामना करु शकतो.
जॉन्सन म्हणाले की, ‘ओमिक्रॉनच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा लागेल. लसीकरण करण्याचा प्रयत्न करा आणि ओमिक्रॉनचा प्रसार कमी करा.’
मंगळवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे 59,610 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एकाच दिवसात तब्बल 20 हजार केसेस वाढल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनचे पीएम जॉन्सन म्हणाले की, असे काही भाग आहेत जिथे एका दिवसात रुग्णसंख्या ही दुप्पट झाली आहे.