Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंट खूपच धोकादायक; नव्या अभ्यासात समोर आली महत्त्वाची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) दिवसेंदिवस कोरोना (Corona) संकट अधिक गहिरं होत चालंल आहे. त्यामुळेच या नव्या व्हेरिएंटविषी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी संशोधक अहोरात्र प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासातून या व्हेरिएंटबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आता या व्हेरिएंटबाबत हाँगकाँग विद्यापीठाचा एक नवीन स्टडी समोर आला आहे. या स्टडीमध्ये जो निष्कर्ष काढण्यात आला आहे तो नक्कीच चिंता वाढवणारा आहे. त्यात असं म्हटलं गेलं आहे की, हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही 70 पट अधिक वेगाने पसरतो.

ADVERTISEMENT

मात्र, यामध्ये दिलासादायक बाब अशी आहे की, या नवीन व्हेरिएंटमुळे लोक गंभीररित्या आजारी पडत नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांना मिळालेल्या डेटावर हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाला आणि मूळ कोविड -19 स्ट्रेनच्या तुलनेत सुमारे 70 पट वेगाने पसरतो.

अभ्यासातील निष्कर्षात काय म्हटलंय?

हे वाचलं का?

स्टडीत असे आढळून आले की, संसर्गानंतर 24 तासांनंतर ओमिक्रॉन श्वसन प्रणालीमध्ये खूप वेगाने पसरतो. संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की, कोरोनाचे नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन हा फुफ्फुसांमध्ये त्याच्या मूळ स्वरूपापेक्षा 10 पट कमी प्रतिकृती बनवते, जे ‘कमी तीव्र’ असल्याचे दर्शवते.

या स्टडीनुसार, ओमिक्रॉन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतो. परंतु फुफ्फुसांना एवढे नुकसान पोहचवत नाही जेवढं याचे आधीचे व्हेरिएंट पोहचवायचे.

ADVERTISEMENT

स्टडीचे प्रमुख लेखक चॅन यांचं म्हणणं आहे की, ‘अनेक लोकांना संक्रमित करून, एक अतिशय संसर्गजन्य विषाणू अधिक गंभीर आजार आणि मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो, जरी हा विषाणू स्वतः कमी रोगजनक असला तरीही.’ ओमिक्रॉन व्हेरिएंट हा लस आणि पूर्वीच्या प्रतिकारशक्तीपासून देखील स्वत:चे संरक्षण करू शकतो. त्यामुळेच हा अधिक धोकादायक मानला जात आहे.

ADVERTISEMENT

शास्त्रज्ञ अजूनही त्याच्या संसर्गाचा दर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळून आल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत, हा व्हेरिएंट किमान 77 देशांमध्ये पसरला आहे. Omicron च्या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, आतापर्यंतचे बहुतेक संक्रमण सौम्य आहेत आणि रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता पडत नाही.

अनेक संशोधक अशी शक्यता देखील व्यक्त करत आहेत की अधिक म्युटेट होणारे व्हेरिएंट्स हे इतर स्ट्रेन्सला देखील जन्म देऊ शकतात. यामुळे, हा साथरोग हळूहळू कमकुवत होईल आणि मर्यादित राहील आणि जग त्याच्याबरोबर जगायला शिकेल.

ओमिक्रॉनचा कहर.. ब्रिटनमध्ये एका दिवसात तब्बल 78,610 नवे रुग्ण, भारतात येऊ शकते लॉकडाऊनची वेळ?

सावधपणा महत्त्वाचा-

ओमिक्रॉनच्या प्राथमिक डेटावरून असे दिसून आले आहे की, बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही किंवा त्यांना ICU मध्ये दाखल करण्याची गरज पडलेली नाही. काही लोकांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्याचं देखील आढळून आलं आहे. पण त्यांना गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत.

तरीही आरोग्य तज्ज्ञ आणि WHO लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. तसेच योग्य प्रकारे मास्क लावा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT