Omicron: कोरोना व्हेरिएंट शोधण्याची पद्धत काय आहे? समजून घ्या सोप्या भाषेत
मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने देशभरातील अनेक राज्यांमध्ये घुसखोरी केली आहे. याचे अनेक रुग्ण आता समोर येत आहेत जी अत्यंत चिंताजनक बाब आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगचे (sequencing) तंत्र वापरले जाते. या तंत्राचे नाव तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत असाल, पण शेवटी जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय, तुमच्या सॅम्पलमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट […]
ADVERTISEMENT
मुंबई: ओमिक्रॉन (Omicron) या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटने देशभरातील अनेक राज्यांमध्ये घुसखोरी केली आहे. याचे अनेक रुग्ण आता समोर येत आहेत जी अत्यंत चिंताजनक बाब आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगचे (sequencing) तंत्र वापरले जाते. या तंत्राचे नाव तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत असाल, पण शेवटी जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय, तुमच्या सॅम्पलमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे की नाही हे कसे समजेल? जाणून घ्या ही संपूर्ण प्रतिक्रिया काय आहे.
ADVERTISEMENT
आयएलबीएसचे कुलगुरू डॉ. एसके सराइन म्हणतात, ज्याप्रमाणे मानवी शरीर डीएनएपासून बनलेले असते, त्याचप्रमाणे व्हायरसही DNA किंवा RNA पासून बनतात. कोरोना व्हायरस आरएनएपासून बनलेला आहे. जीनोम सिक्वेन्सिंग हे असं तंत्र आहे ज्याद्वारे आरएनएची जेनेटिक माहिती मिळविली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, व्हायरस कसा आहे, तो कसा हल्ला करतो आणि त्यात कसा वाढतो हे जाणून घेण्यासाठी जीनोम सीक्वेंस उपयुक्त आहे.
RNA प्रोसेसिंगची प्रक्रिया
हे वाचलं का?
सर्वप्रथम तुमचा RT-PCR सॅम्पलला bsl3 लॅबमध्ये आणला जातो. तेथे या सॅम्पलमधून आरएनएला वेगळे केले जाते. यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगची प्रक्रिया केली जाते. म्हणून आरएनएला त्या सॅम्पल व्हायरसपासून वेगळे करणे फार महत्वाचे असते. आरएनए वेगळे केल्यानंतर, ते -80 अंश तापमानात ठेवले जाते. यानंतर, थेट जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये आणले जाते. जिथे आरएनए प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरू होते.
ADVERTISEMENT
RNA चे DNA मध्ये केले जाते रूपांतर
ADVERTISEMENT
लॅबचे डॉक्टर प्रमोद सांगतात की आरएनए प्रोसेसिंगच्या प्रक्रियेमध्ये आरएनएलाडीएनएमध्ये रूपांतर केले जाते. असं यासाठी केले जाते की, कारण RNA खूप लवकर रिअॅक्ट होतं, ज्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारची चाचणी करणे शक्य नसते. त्यामुळे त्याला डीएनएमध्ये रूपांतरित केले जाते. त्याचे डीएनएमध्ये रूपांतर करण्यासाठी ते पीसीआर मशीनमध्ये कमी तापमानात ठेवले जाते. डीएनएचे आरएनएमध्ये रूपांतर झाल्यावर ते विखंडनासाठी पाठवले जाते.
विखंडन म्हणजे काय?
डॉ वरुण यांनी सांगितले की, विखंडन ही प्रक्रिया आहे जिथे डीएनए लहान तुकड्यांमध्ये विभागला जातो. डीएनए सॅम्पल हे खूप मोठं असल्याने त्याचा क्रम लावता येत नाही. या कारणास्तव त्याचे विखंडन करणे फार महत्वाचे आहे. विखंडन झाल्यानंतर इंडेक्सिंगची प्रक्रिया होते. या प्रक्रियेत, प्रत्येक नमुना नावासह टॅग केला जातो.
अॅनालायझर मशीनमधून मिळते माहिती
इंडेक्शननंतर ते याला सीक्वेंसिंगसाठी अॅनालायझर मशीनमध्ये ठेवले जाते. अॅनालायझर मशीनमध्ये हे समजते की, सॅम्पलचे प्रमाण आणि गुणवत्ता योग्य आहे की नाही. येथे सर्वकाही बरोबर असल्यास, आलेखाद्वारे हे समजते की सॅम्पल पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाऊ शकतो.
Omicron Variant: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?
केमिकल्सने केले जाते सिक्वेन्सिंग
अॅनालाइजनंतर, हा मंजूर सॅम्पल एका मशीनमध्ये ठेवला जातो जिथे तो अनेक रसायनांमध्ये मिसळला जातो. या मशीनमध्ये संपूर्ण सीक्वेंसिंग प्रक्रिया होते. सीक्वेन्सिंगच्या मशिनमधील डेटा हा अॅनालायझर मशीनमध्ये टाकला जाते, ज्यामुळे हे समजतं की, सॅम्पलमध्ये कोणतं व्हेरिएंट सापडलं आहे.
डेटा अॅनालायझर मशीनमध्ये, जीनोममध्ये होणाऱ्या बदलांबद्दल माहिती मिळते. हे बदल जुन्या व्हायरसपेक्षा किती वेगळा आहे? हे देखील सांगते. सीक्वेन्सिंगच्या मदतीने डॉक्टर समजू शकतात की व्हायरसमध्ये म्युटेशन कुठे झाले आहे. जर कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाले असेल तर ते अधिक संसर्गजन्य समजले जाते. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT