कोण होतास तू, काय झालास तू? देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर खरमरीत टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दांमध्ये खरमरीत टीका केली आहे. भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातली वसुली, नक्षलवाद, दंगल या सगळ्या विषयांवर फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार-फडणवीस संजय राऊत यांच्यावर […]
ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दांमध्ये खरमरीत टीका केली आहे. भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातली वसुली, नक्षलवाद, दंगल या सगळ्या विषयांवर फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.
महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार-फडणवीस
संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात दंगल भाजपमुळे झाली.. आज मला ते गाणं आठवतं आहे, कोण होतास तू? काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.