उस्मानाबाद : अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी, लाखोंचा मुद्देमाल जप्त, २८ गुन्हे दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध दारु भट्ट्यांविरुद्ध पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून मोहीम उघडली आहे. पोलीस अधिक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध भागांत २८ ठिकाणी छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी उस्मानाबाद पोलिसांनी २८ ठिकाणी छापेमारी केली, ज्यात पिंपांमध्ये हातभट्टीत मद्यनिर्मितीसाठी वापरला जाणारा ५ हजार ८६० मिली द्रव्य […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद जिल्ह्यातील अवैध दारु भट्ट्यांविरुद्ध पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून मोहीम उघडली आहे. पोलीस अधिक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध भागांत २८ ठिकाणी छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत गुन्हे दाखल केले आहेत.
मंगळवारी उस्मानाबाद पोलिसांनी २८ ठिकाणी छापेमारी केली, ज्यात पिंपांमध्ये हातभट्टीत मद्यनिर्मितीसाठी वापरला जाणारा ५ हजार ८६० मिली द्रव्य पदार्थ पोलिसांनी जागच्या जागी नष्ट केला आहे. याव्यतिरीक्त पोलिसांनी 282 लि. हातभट्टी दारु, 184 बाटल्या देशी- विदेशी दारु व 24 लि. शिंदी जप्त करुन संबंधीतांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 28 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत.

पहिल्या कारवाईत, मुरुम पोलीसांनी 6 ठिकाणी छापे टाकले असता केसरजवळगा गावातील मठामागे राणेश गायकवाड या व्यक्तीकडे 8 लि. हातभट्टीची दारु सापडली. आलूर येथे शंकर राठोड हे 20 लि. हातभट्टी दारु तर चंद्रकांत गवंडी हे 14 लि. हातभट्टी दारुसह पोलिसांना सापडले. याव्यतिरीक्त चनाप्पा क्षिरसागर हे 20 लि. हातभट्टी दारुसहीत, तर गंगुबाई धुमाळ यांच्याकडेही पोलिसांना 22 लि. हातभट्टीची दारु सापडली. तसेच मुरुम येथील मिर्झा भुखंडावर हुसणय्या तेलंग यांच्याजवळ 15 लि. शिंदी सापडली.
