चाबकाचे फटके, नग्न उभं राहुन विष्ठा खायला भाग पाडल्याचा आरोप ! उस्मानाबादेत जातपंचायतीचा भीषण चेहरा समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद जिल्ह्यात जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ढोकी या गावातील आरोपी पंच कालिदास काळे (वय 70) व दादा चव्हाण (वय 30) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जातपंचायत छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी ही अटक केली आहे. आनंद नगर पोलीस ठाण्यात 25 जणांसह इतर 10 ते 15 जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा व जातपंचायत प्रतिबंधक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जातपंचायतीने जमिनीच्या व्यवहारात पती-पत्नीला ठोठावलेला 2 लाख रुपयांचा दंड न दिल्याने वाळीत टाकत त्यांचा छळ केला जात होता. दंड न दिल्याने काटेरी चाबकाचे फटके मारून जबरदस्तीने विष्ठा खायला भाग पडल्याचा तर पीडित महिलेला जातपंचायतसमोर नग्न उभे केल्याचा आरोप केला जात आहे. जात पंचायतीच्या शिक्षेत अपमान झाल्याने खचून पती-पत्नी यांनी 24 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता ज्यात पतीचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

जातपंचायतीने अपघातातील मयताच्या नुकसान भरपाई पोटी 4 एकर जमीन व 7 लाख दंड न दिल्याने पून्हा जातपंचायतने 2 लाख दंड ठोठावला त्यातील 20 हजार दिले व उरलेली रक्कम 4 दिवसात देण्यास मुदत दिली मात्र पैसे न जमा झाल्याने खचून पती पत्नी जोडप्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यात सोमनाथ काळे यांचा सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू तर फिर्यादी पत्नी सुनीता काळे या बचवल्यानंतर या जातपंचायत छळाच्या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मयताच्या नातेवाईक यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणातील मयत सोमनाथ काळे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात एकाचा जीव गेल्यामुळे जात पंचायतीने नुकसान भरपाईपोटी ४ एकर जमीन आणि ७ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम न भरल्यास पंचायतीने आणखी २ लाखांचा दंड ठोठावला. यावेळी सोमनाथ काळे यांनी दंडातली २० हजार रक्कम देऊन उर्वरित रक्कम ४ दिवसांत देण्याची मुदत मागितली. परंतू पैसे जमा न झाल्यामुळे पती सोमनाथ काळे आणि पत्नी सुनीता काळे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

यादरम्यान सोमनाथ काळे यांचा सोलापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी सुनीता काळे यांचा जीव वाचवल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर प्रकरणाला वाचा फुटली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. परंतू महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जात पंचायतीचा असलेला भीषण पगडा या निमीत्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT