Hareem Shah: Tiktok स्टारचा MMS लीक, थेट सांगितलं ‘यांनी’ केलं घाणेरडं काम!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Hareem Shah MMS video leaked: पाकिस्तानी टिक-टॉक स्टार हरीम शाह (Hareem Shah) ही नेहमीच वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी ती तिच्या MMS मुळे चर्चेत आली आहे. हरीम शाहने आपल्या लीक झालेल्या व्हिडीओबाबत (Video) दुजोरा दिला आहे. नुकतंच तिने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर हे घाणेरडे काम नेमकं कोणी केलं हे देखील तिने जाहीरपणे सांगून टाकलं आहे. हा MMS व्हिडीओ कोणी व्हायरल (Viral) केला हे सांगताना तिने अजिबात हयगय केली नाही. (pakistani tiktok star harim shahs mms leaked she directly told who did this dirty work)

ADVERTISEMENT

लीक झालेल्या व्हिडिओला दुजोरा देताना हरीम शाहने सांगितले की, तिच्या जुन्या मित्रांनीच हे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. हे व्हिडीओ चंदन खट्टक आणि आयेशा नाज यांनी त्यांच्या मोबाईलमधून चोरले असून त्यांनीच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोपी हरीमने केला आहे. याशिवाय हे व्हिडीओ लीक करण्यात दुसरं कुणीही सामील नसल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.

बलात्कार पीडितेचं जगणं झालंय मुश्कील, ‘तो’ Video व्हायरल झाल्याने 5 वर्षापासून पीडिता घरातच

हे वाचलं का?

कायदेशीर कारवाई करणार

व्हिडीओ लीक करणाऱ्यांवर ती कायदेशीर कारवाई करणार असून या संदर्भात FIA कडेही जाणार असल्याचे तिने सांगितले. हरीम शाहचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तिने बिलाल शाह याच्याशी लग्न केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान हरीम शाहने सांगितले की, ‘बिलाल शाह आणि माझी पहिली भेट कराचीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली होती.’

ADVERTISEMENT

बिलाल शाहसोबतची प्रेमकहाणी

YouTuber नादिल अलीच्या शो पॉडकास्ट दरम्यान, हरीम शाहने तिची प्रेमकथा खुलेआम सांगितली होती. तिने सांगितले होते की, ‘बिलाल शाह आणि मी कराचीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पहिल्यांदा अनपेक्षितपणे भेटलो होतो, त्यानंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो. त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं. सुरुवातीला मला वाटले की तो मस्ती करतोय. पण प्रपोज केल्यानंतर मी बिलाल शाहला त्याच्या आई-वडिलांना माझ्या घरी पाठवायला सांगितलं आणि त्यामुळे औपचारिक प्रकरण मिटलं. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने हा विवाह पार पडला.’

ADVERTISEMENT

Shubhman gill : शुभमन गिल आणि सारा अली खान एकत्र काय करतायेत? फोटो लीक

हरीम शाहने मुफ्ती यांच्या श्रीमुखात भडकावलेली

जानेवारी 2021 मध्ये हरीम शाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या मुफ्ती अब्दुल कवी यांना थप्पड मारताना दिसली होती. एका टीव्ही चॅनलवरील संभाषणात मुफ्ती यांनी आपल्यावर अश्लील कमेंट केल्याचा आरोप हरीमने केला होता. दुसरीकडे, मुफ्ती यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. मात्र, या सगळ्या प्रकरणांमुळेच हरीम ही चर्चेत आली होती.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी; नंबर लीक झाल्यावर भाजपवर केला आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT