भाजपशासित कर्नाटकात वीर सावरकरांचा अपमान? बुलबुलच्या पंखावर बसून देशभ्रमणाचा उल्लेख

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कर्नाटक सरकार पुन्हा एकदा चर्चेत आहे. भाजपची सत्ता असूनही या ठिकाणी ८ वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यात वीर सावकर यांच्याविषयी एक उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख असा आहे की त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. अशात कायमच वीर सावरकर यांचा अभिमान आणि वारसा सांगणाऱ्या वीर सावरकरांबाबत कर्नाटकच्या पाठ्यपुस्तकातच वादग्रस्त उल्लेख कसा? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

ADVERTISEMENT

Narendra Modi: “वीर सावरकर तुरुंगात बेड्या चिपळ्यांप्रमाणे वाजवत,तुकोबांचे अभंग म्हणत”

काय म्हटलं आहे आठवीच्या पाठ्यपुस्तकात?

८ वीच्या पुस्तकात हे म्हणण्यात आलं आहे की हिंदू विचारांचे प्रणेते वीर सावकरर हे अंदमानच्या तुरुंगात होते तेव्हा ते बुलबुल पक्षाच्या पंखावर बसून देशभ्रमण करत होते. हे पुस्तक कन्नड भाषेत आहे. ८ वीच्या पाठ्यपुस्तकात हा धडा आधी नव्हता. याचवर्षी नव्याने संशोधन करून हा धडा आणि त्यातला उल्लेख जोडण्यात आला आहे. या पुस्तकातला नेमका हाच उल्लेख व्हायरल होतो आहे. कर्नाटक सरकारने पुस्तकात बदल करण्याची जबाबदारी रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेत रिव्हिजन कमिटीला दिली होती. ही समिती आता बरखास्त करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

या पाठ्यपुस्तकात नेमकं काय म्हटलं गेलं आहे?

वीर सावरकर यांना ज्या खोलीत बंद करण्यात आलं होतं तिथे सूर्याचा किरण पोहचेल इतकं छोटं की होलही नव्हतं. तरीही या बंद खोलीत बुलबुल कुठून तरी येत असे. त्यानंतर त्याच्या पंखावर बसून वीर सावरकर देश भ्रमण करत असत असा उल्लेख आठवीच्या सुधारित पुस्तकात करण्यात आला आहे. ही भाषा कन्नड आहे. आठवीच्या पाठ्यपुस्तकात सुधारित अभ्यासक्रमात जो धडा समाविष्ट करण्यात आला आहे त्यात हा उल्लेख आहे.

ADVERTISEMENT

आठवीच्या पुस्तकात आहे हा उल्लेख

सध्या कर्नाटकच्या आठवीच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. या राज्यात विद्यार्थ्यांसाठी दुसरी भाषा म्हणजेच सेकंड लँग्वेज आहे. या पुस्तकात वीर सावरकरांविषयी हा उल्लेख करण्यात आला आहे. या उल्लेखामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. वीर सावरकर यांच्याबाबत अपमान करणारा हा उल्लेख आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. अशात या राज्यातही असा उल्लेख केला जातो आहे याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT