Pathaan : पठाण’ने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan Box Office Worldwide Day 3 : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan Movie) चित्रपटाची जादू जगभरात चालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले असून या चित्रपटाने अनेक (Record) विक्रम केले आहेत. आता ‘पठाण’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे वृत्तही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जरी या चित्रपटाने भारतात फार मोठे कलेक्शन केले नसले तरी जगभरातील बॉक्स (Worldwibe Collection) ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. (Pathaan Movie 300 Crore Collection In 3 Days)

ADVERTISEMENT

पठाणने 300 कोटींचा आकडा पार केला

ट्रेंड विश्लेषक रमेश बाला यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, ‘पठाण’ने भारतात 34 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नॉन-हॉलिडेसाठी हे योग्य कलेक्शन आहे, पण शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्या आणि दुस-या दिवशी ज्या प्रकारे कमाई केली ते पाहता ही संख्या खूपच कमी आहे. तसेच ‘पठाण’ ‘दंगल’, ‘बाहुबली 2’ आणि ‘केजीएफ 2’च्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनची बरोबरी करण्यात अपयशी ठरला आहे.

पण निराश व्हायची गरज नाही, कारण ‘पठाण’ आजही जगभराच चालत आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, ‘पठाण’ने अवघ्या तीन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यासह ‘पठाण’ने आणखी एका विक्रमावर आपले नाव कोरले आहे. आता वीकेंडला या चित्रपटाचे कलेक्शन कोणत्या नव्या उंचीवर पोहोचते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

पहिल्या दिवसापासून पठानचा करिश्मा

‘पठाण’चे ओपनिंग डे कलेक्शन 54 कोटी रुपये होते. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी आतापर्यंतचा सर्वात मोठा कलेक्शन केला आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने जगभरात 106 कोटींची कमाई केली. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत ‘पठाण’ने दुसऱ्या दिवशी भारतात 70 कोटींची कमाई केली. हे कलेक्शन जगभरातील बॉक्स ऑफिसवर 235 कोटींवर पोहोचले. आता तीन दिवसांत ‘पठाण’च्या जगभरातील कलेक्शनने 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

शाहरुख खानच्या या चित्रपटाने आतापर्यंत 21 नवीन विक्रम केले आहेत. कोविड-19 नंतर ‘पठाण’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे, ज्याने सलग दोन दिवस मोठी कमाई केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात बॉलिवूडचा दुष्काळ ‘पठाण’ने संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. जगभरातील चाहत्यांसह बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटीही हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते आणि त्यांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे. ‘पठाण’ने यशराज फिल्म्सच्या प्रॉडक्शन हाऊसचे 2022 चे बॅडलकही संपवले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT