Petrol and Diesel Price Hike : पुन्हा महागलं पेट्रोल आणि डिझेल, मुंबईत पेट्रोल 106 रूपये लिटर
Petrol and Diesel Price Hike पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी दर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीत 30 ते 39 पैसे प्रति लिटर एवढी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये 24 ते 32 पैसे एवढी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106 रूपये प्रति लिटर […]
ADVERTISEMENT
Petrol and Diesel Price Hike पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी दर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीत 30 ते 39 पैसे प्रति लिटर एवढी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये 24 ते 32 पैसे एवढी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे तर डिझेलचा दर 97 रूपये 46 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.
दिल्लीतही पेट्रोल प्रति लिटर 100 रूपये 91 पैसे झालं आहे. तर डिझेलचा दर 89 रूपये 88 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. कोलकाता या ठिकाणी पेट्रोलसाठी 101. 1 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.97 रूपये इतका झाला आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 109 रूपये लिटर झालं आहे तर डिझेलची किंमत 98.67 रूपये इतकी झाली आहे. महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये इंधन दर वाढले आहेत. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105 रूपये किंवा त्यापुढेही गेला आहे. तर डिझेलही लवकरच प्रति लिटर 100 रूपये होऊ शकतं अशीच चिन्हं आहेत.
जुलै महिना सुरू झाल्यापासून म्हणजेच मागच्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये सहावेळा तर डिझेलच्या दरांमध्ये चारवेळा वाढ झाली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 16 वेळा वाढ झाली होती. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे रोजी निकाल लागला. यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरूवात झाली. निवडणूक काळात 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमूद केलेल्या दरांप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
The price of petrol & diesel in #Delhi is at Rs 100.91 per litre & Rs 89.88 per litre respectively today
Petrol & diesel prices per litre – Rs 106.93 & Rs 97.46 in #Mumbai; Rs 109.24 & Rs 98.67 in #Bhopal; Rs 101.01 & Rs 92.97 in #Kolkata respectively pic.twitter.com/hhBZijIHvG
— ANI (@ANI) July 10, 2021
महाराष्ट्रात पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवत काँग्रेसने दोन दिवस आंदोलन केलं. नागपूरमध्ये नाना पटोले यांनी गुरूवारी भर पावसात सायकल रॅली काढली. तर शुक्रवारी महिलांनी चूल पेटवा आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार कमी करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान केंद्र सरकारचा यात काहीही दोष नाही. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर आकारला जातो त्यातले 42 रूपये राज्य सरकारला मिळतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर राज्याने कर कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील असंही त्यांनी सुचवलं. मात्र अजित पवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरची जी करप्रणाली आहे ती फडणवीस सरकारच्याच काळातली आहे. त्यामध्ये आमच्या सरकारने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT