पुन्हा महाग झालं पेट्रोल आणि डिझेल… मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 111 रूपये 77 पैसे
देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 111 रूपये 77 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेल 102 रूपये 52 पैसे प्रति लिटर इतकं झालं आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 35 पैसे आणि डिझेलच्या दरांमध्येही प्रति लिटर 34 पैसे वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 37 […]
ADVERTISEMENT
देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 111 रूपये 77 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेल 102 रूपये 52 पैसे प्रति लिटर इतकं झालं आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 35 पैसे आणि डिझेलच्या दरांमध्येही प्रति लिटर 34 पैसे वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागलं आहे.
ADVERTISEMENT
Prices of petrol and diesel rise by Re 0.35 (at Rs 105.84/litre) and Re 0.35 (at Rs 94.57/litre) respectively in Delhi today
In Mumbai, petrol is priced at Rs 111.77/litre (up by Re 0.34) and diesel costs Rs 102.52/litre (up by Re 0.37) today pic.twitter.com/cNqotF9rqA
— ANI (@ANI) October 17, 2021
पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली, सुबोध भावेने केंद्र सरकारवर साधला निशाणा
गेल्या तीन आठवड्यांमधली पेट्रोलच्या किंमतीतली ही 16 वी तर डिझेलच्या किंमतीतली ही 19 वी वाढ आहे. या दरवाढीमुळे सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे.
हे वाचलं का?
तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी…
एक मेसेज करून आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑईलच्या एसएमएस सेवेचा वापर करता येईल. आपल्या मोबाईलवरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा लागणार आहे. RSP स्पेस देऊन पेट्रोल पंप डिलरचा कोड टाका आणि मेसेज सेंड करा. RSP कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आपल्या मिळेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशातल्या बालाघाट या ठिकाणी पेट्रोल ची किंमत प्रति लिटर 116 रूपये इतकी पोहचली आहे. तर डिझेलचे दर 105 रूपये 59 पैसे प्रति लिटर इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातली प्रमुख शहरं आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर
मुंबई – 111.77
नागपूर 111.49
नाशिक-112.40
पुणे- 111.61
ठाणे- 111.61
औरंगाबाद- 112. 09
जळगाव-113.20
नांदेड-113.59
नंदुरबार-112.50
रत्नागिरी- 113. 19
महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांवर नजर टाकली तर लक्षात येतं की नंदुरबार, रत्नागिरी आणि जळगाव या शहरांमध्ये पेट्रोल 113 रूपये प्रति लिटरच्या पुढे गेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT